नांदेड (प्रतिनिधी)- एका खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राजू बिल्डरला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.आर. सोमाणी यांनी दोन दिवस अर्थात 5 ऑगस्ट 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
26 जून 2022 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा क्र. 246/2022 हा एका जागेवर बळजबरीने कब्जा मारण्याचा प्रयत्न आणि खंडणी मागणे अशा स्वरूपाचा होता. हा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान या प्रकरणात एकाला अटक झाली होती, त्यानंतर दुसरा गुरचरणसिंघ दिलीपसिंघ सिद्धू उर्फ राजू बिल्डर यास स्थानिक गुन्हा शाखेने पकडले.
आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनात आज सहायक पोलीस निरीक्षक एच.एच. मिटके आणि त्यांच्या सहकार्यांनी राजू बिल्डरला न्यायालयात हजर केले. न्यायालयासमोर करण्यात आलेल्या सादरीकरणानंतर न्यायालयाने राजू बिल्डरला दोन दिवस अर्थात 5 ऑगस्ट 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2022/08/02/खंडणी-प्रकरणात-राजू-बिल्/