नांदेड (प्रतिनिधी)-येथील कल्याणनगर येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक सदाशिवराव धोंडीबाराव तुप्पेकर ( वय ७० ) यांचे अल्पशा आजाराने बुधवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता त्यांचे मूळ गाव तरोडा (बु) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ते नगरसेवक प्रतिनिधी सखाराम तुप्पेकर आणि यादव तुप्पेकर यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, दोन मुले, नातू, सुना असा परिवार आहे.