
नांदेड,(प्रतिनिधी)- पावसाने काल रात्री पासून पुन्हा एकदा झोडपून काढले आहे.नांदेड शहरात आणि जिल्ह्यात धुवांधार पावसाने झोडपून काढले आहे.पुन्हा एकदा पिकांचे नुकसान झाले आहे,शहरात आणि जिल्ह्यात सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल दिनांक ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह आपल्या आगमनाची सूचना पाठवली. काही वेळाने जोरदार पाऊस सुरु झाला.पाण्याचा जोर जवळपास एक तास सुरूच होता.नंतर काही काळ पाऊस थांबला.पण पुन्हा काही वेळाने पाऊस जोरदार पाने झोडपायला लागला.आज सकाळी ५ वाजे पासून पावसाने पुन्हा एकदा झोडपले.जवळपास एक तास पावसाचा जोर कायम होता.पावसाने शहरातील अनेक भागांमध्ये पाणीच पाणी साचले.अनेक जागी गुडघा बुडेल अश्या अवस्थेत पाणी भरलेले होते. पण बिचारे नागरिक काय करू शकतात.भौतिक सुविधा देण्याची जबाबदारी महानगर पालिकेची असतांना सुद्धा त्रास काही कमी होत नाही.कर वसुली करतांना मात्र जबरदस्ती आणि सुविधा देतांना बोंबाबोंब असो या लोकांना निवडून सुद्धा जनतेनेच दिले आहे ना .
ग्रामीण भागात सुद्धा अनेक ठिकाणी पाण्याने हाहाकार उडवला.अनेक शेत जमिनींमधून नदीसारखे पाण्याचे पाट वाहत होते.काही अंशी जगण्याच्या उर्मीने उगवलेली पिके पुन्हा मान खाली टाकून पडली आहेत.निसर्ग सुद्धा माफी देण्याच्या तयारीत नाही असेच आज तरी दिसत आहे. कृपा कर आता वरून देवा पिकांना हवे तेव्हा ये आणि नको तेव्हा थांब अशी नम्र विनंती.