नांदेड,(प्रतिनिधी)- मुखेड शहरात असलेल्या एका मोठ्या जुगार अंड्यावर मोठ्ठी लूट झाली.पण जुंगरचे अड्डे नांदेड जिल्ह्यात कोठेच सुरु नाहीत. तरीही प्रसार माध्यमांनी उगीचच टीकेची झोड उठवली.आता त्या ठिकाणी झालेल्या लुटीचा गुन्हा नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणला आहे.पण त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना ‘प्रसाद’ देऊन ‘नजराणा’ वसूल करण्यात आला त्यांची चौकशी तरी व्हावी.त्या लुटीचा खरा मास्टर माईंड कोण हे तरी शोधावे आणि सर्वात मोठे गुंड पोलिसच असतात हे दाखवावे अशी अपेक्षा आहे.
दिनांक २४ जुलै २०२२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मुखेड शहरातील राजेश बार अँड रेस्टारंटमध्ये काही दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला.अनेकांना ‘प्रसाद’ वाटत वाटत दरोडेखोरांनी अनेक ‘नजराणे’ वसूल केले. त्या ठिकाणी नांदेड जिल्हा आणि इतर जिल्ह्यातून जुगारी आले होते. त्यातील अनेकांनी प्रसाद आणि नजराणे अनुभवले आहेत.या बाबत प्रसार माध्यमांनी जुगार अड्डा लूट अश्या आशयाच्या अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या.तेव्हा राजेश बारचे मालक राजेश शंकरराव गजलवाड यांनी २६ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुखेड पोलिसांनी गुन्हा क्रमांक २२४/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३९२,३४ नुसार दाखल केला. या तक्रारीनुसार दरोडेखोरांनी १८ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लुटून नेली होती.
जिल्ह्यातील प्रत्येक गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे अधिकार असणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेने फक्त एका आठवड्याच्या आत या दरोडेखोरांचा शोध लावला आणि अमित शेषराव गोडबोले रा.सहयोग नगर नांदेड यास गजाआड केले.त्याने संगितल्यानुसार त्याने आणि आवेज उर्फ अब्बू महेबूब शेख,गब्बरसिंघ उर्फ गब्बू जसविंदरसिंघ तिवाना आणि आकाश राजेश करनाळे अश्या लोकांसोबत आणखीन पाच जण होते. सर्वानी मिळून ही लूट केली होती. म्हणजे एकूण ९ दरोडेखोर होते.नऊ दरोडेखोरांनी मिळून फक्त १८ हजारांची लूट केली यावर कोण विश्वास ठेवील.असो हि सर्व माहिती पोलीस विभागाने प्रेस नोटच्या माध्यमातून दिली आहे.पोलिसांनी केलेले कार्य नक्कीच वाखाणण्या सारखेच आहे.
पण पुढे सुद्धा अनेक प्रश्न आहेत. कोणी दिली ती टीप लूट करण्याच्या जागेची दरोडेखोरांना.कोण कोण कोठून आले होते तेथे दिनांक २४ जुलै २०२२ रोजी,कोणा कोणाला ‘प्रसाद’ घेऊन ‘नजराणे’ दु\द्यावे लागले, अश्या सर्व बाबीचा शोध पण घेतला पाहिजे.पोलीस विभागला तर गुप्त माहिती कोठून मिळवली याबाबत सर्वोच न्यायालय सुद्धा विचारणा करू शकत नाही.काही पोलिसांच्या माहितीगारांना माझा बातमीदार होता.पण त्यावर सुद्धा जरब अत्यंत आवश्यक आहे कारण हेच माहितीगार,बातमीदार समाजात काय काय करतात ते सुद्धा पोलिसांचे नाव घेऊन याचाही शोध होण्याची गरज आहे. माझा माहितीगार होता,असे सुरक्षा चक्र सुद्धा प्राप्त असतेच. असे सुरक्षा चक्र देणे योग्य आहे काय ? तरीही पोलिसांनी याबाबत स्वतः शोध घ्यावा कारण त्यांना लुटारूंची माहिती देणाराच तर मुख्य मास्टर माईंड नसेल काय ? जुगार अड्डा नव्हे हो बार अँड रेस्टारंट लुटणाऱ्याबद्दल लिहिली आहे ही बातमी.