नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आता एकाच हायवा गाडीतून रेतीची तस्करी होत आहे. इतर तस्कर गाड्यांना मात्र रेती उपसा करण्यास बंदी करण्यात आली आहे. मग या एकाच गाडीवर काय प्रेम आणि कोणाचे प्रेम याचा उलगडा होत नाही.
रेती तस्करीच्या संदर्भाने मागील महिन्यात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठे रामायण घडले. त्या रामायणाला सन्माननीय श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांनी महाभारतात बदलले. महाभारतात आपल्याच नातलगांचा मुडदा पाडून युद्धात विजय मिळविला गेला होता. पण नव्या प्रकारचे महाभारत असे आहे की, रेती संदर्भाचे वेगवेगळे गुन्हा दाखल करून त्यांच्या नामोहरम केले जात आहे. युद्ध आणि प्रेम यामध्ये प्रत्येक कृती योग्य मानली गेली आहे आणि त्यात विजय मिळवायचा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. मिळतो का आशेने विजय पण याचे उत्तर आजपर्यंत प्राप्त झाले नाही. असाच इतिहास आहे. जिथे कोठे अशा प्रकरणांमध्ये विजय मिळाला असेल त्यात नुकसान जास्त झाले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेतीचा कारभार सांभाळायला आता कोणीच तयार नाही. त्यामुळे काही जणांना गुन्हे शोध पथकातून बदलण्यात आले आहे. त्यातील एकाला पोलीस ठाणे अंमलदाराकडे आणि एकाला बिनतारी संदेश यंत्रणेवर नोकरी देण्यात आली आहे. हा प्रशासनाचा विषय आहे. त्यात कोण कोठे नोकरी करावी हे ठरविण्याचे अधिकार फक्त आणि फक्त प्रभारी अधिकाऱ्याला असतात. पण रेतीचा कारभार करत नाही असा नकार दिला असेल तर ही कृती योग्य म्हणता येणार नाही. पण रेतीचा कारभार म्हणजे काय याचा उलगडा आम्हालाही झाला नाही.
एक जबरदस्त नवीन खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ज्या-ज्या ठिकाणातून रेती उपसा होतो, त्या जागा पुन्हा निसर्गाने अर्थात जबरदस्त पडलेल्या पावसाने हिरव्या झाल्या आहेत. हिरव्याचा अर्थ त्या जागा पुन्हा एकदा रेतीने भरल्या आहेत. पण रेती तस्करी करणाऱ्यांवर मोठी जरब बसविण्यात आली आहे. कोणत्याच गाडीला रेती घाटावर जाण्यास बंदी करण्यात आली आहे. पण एक हायवा गाडी मात्र रेती घाटावर सहज जाते तीच रेती भरते आणि तीच आणती. या गाडीचा क्र.एम.एच. 23 ए.यु. 1258 असा आहे. ही गाडी कोणाची, कोणामुळे या गाडीला परवानगी, कोणी दिली ही परवानगी ही गाडी रात्री रेती कशी भरते, ही गाडी रेती भरल्याबद्दलचे महसूल यंत्रणेची फिस भरते का अशी अनेक प्रश्न या गाडीमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. भरपूर वृत्तांचे प्रकाशन झाले आहे. तरी त्यावर कार्यवाही का होत नाही, किंबहुना केली जात नाही काय याचे उत्तर मात्र सापडत नाही.