नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वाळू वाहनाला वाळू उपसाची परवानगी आहे ही कोणाच्या परवानगीने आशा आशयाचे वृत्त काही तासांपुर्वीच प्रसारीत केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर काही तासातच रेती उपसा करणारे वाहन क्रमांक एम.एच.23 ए.यु.1258 हे हायवा वाहन बीड जिल्ह्याच्या परिवहन विभागाने काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) केले असल्याची माहिती हाती आली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू उपसा करणाऱ्या सर्वच वाहनांवर अत्यंत कर्तव्यकठोर काम करणारे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांनी बंदी टाकली आहे. पण एकच वाहन दिवस-रात्र या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळू घाटांवरून उपसा करत आहे. त्या वाहनाच्या फोटोसह वास्तव न्युज लाईव्हने काहीच तासापुर्वी वृत्त प्रकाशित केले होते.
काही खात्रीलायक सुत्रांनी या बातमीतील वाहन क्रमांक एम.एच.23 ए.यु.1258 ची ऑनलाईन मिळणारी माहिती घेवून आम्हाला पाठवली आहे. त्यात वाहन क्रमांक 1258 परिवहन विभाग बीड यांनी काळ्या यादीत टाकलेले आहे. हे हायवा वाहन टाटा कंपनीने फायनान्स केलेले आहे. या वाहनाच्या पहिल्या मालकाचे नाव मिस्टर प्रविण राऊत असे नमुद आहे. या गाडीला टाटा कंपनीने दिलेले फायनान्स 26 एप्रिल 2018 पासून दिलेले आहे. या वाहनाची नोंदणी बीड जिल्हा परिवहन विभागातील आहे. या वाहनाला काळ्या यादीत टाकण्याचे कारण आणि त्याचा सीआर नंबर 819953 असा आहे. या गाडीला काळ्या यादीत टाकल्याची तारीख 5 जुलै 2019 अशी नोंदवलेली आहे.
सध्याच्या परिस्थितीत निसर्गाने पुन्हा एकदा नदीपात्रात वाळू भरून दिली आहे. कायदेशीर नोंदणी असलेल्या वाहनांच्या ऐवजी परिवहन विभागाने काळ्या यादीत टाकलेल्या वाहनांमधून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू उपसाचा नवीन धंदा सुरू करण्यात आला आहे. पण कोण तपासणार हे सर्व, कोण करणार यावर कार्यवाही हा प्रश्न चिन्ह मागील दीड वर्षापेक्षा जास्त काळापासून कायम होता, आजही आहे आणि पुढेही राहिल अशीच परिस्थिती आहे. यावरून भारतात, महाराष्ट्रात किती कडक स्वरुपाचे कायद्याचे राज्य सुरू आहे हे स्पष्ट होते.
आजच कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डाँ.विपिन यांनी राहेर जवळील गोदावरी नदी पात्रातून वाळू उपसा करण्यावर आँक्टोंबर पर्यंत बंदी टाकली आहे असे आदेश दिले असल्याची माहिती प्रसार माध्यमांना जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिध्दीसाठी पाठवली आहे.मग नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेती घाटांवर असा बंदी आदेश का नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.
संबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2022/08/06/नांदेड-ग्रामीण-पोलीस-ठाण-47/