नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस विभागातील व्यक्तींना रॉयल इनफिल्ड प्रा.लि. या कंपनीने सवलतीचे दर देऊ केले आहे. या संबंधाची माहिती राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधीक्षक, सर्व राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक, सर्व पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य आणि संचालक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक यांना पाठविण्यात आले आहे.
पोलीस संचालक कार्यालयातील कार्यासन अधिकारी वर्षा कारभारी यांनी जारी केलेल्या पत्रानुसार रॉयल इनफिल्ड अर्थात बुलेट गाडीमध्ये कंपनीने पोलीस दलातील व्यक्तींना कमी किंमतीत ही गाडी देण्याचे ठरविले आहे. 1,84,929/- एवढ्या किंमतीची गाडी पोलिसांना 1,77,339/- रूपयांमध्ये मिळणार आहे. तसेच या वरच्या किंमतीतील गाड्यांमध्ये असाच काहीसा फरक करत 3,75,253/- रूपयांची गाडी पोलीस विभागाला 3,62,966/- रूपयांमध्ये मिळणार आहे. अशा एकूण वेगवेगळ्या 20 प्रकारच्या गाड्यांची माहिती या पत्रात दिली आहे. त्या प्रत्येक गाडीमध्ये पोलीस विभागाला कमी किंमतीत आम्ही गाड्या देऊ असे सुचविण्यात आले आहे.