मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम  

नांदेड (प्रतिनिधी) –  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार 7 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्ली येथून विमानाने श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळ, नांदेड येथे रात्री 9.15 वाजता आगमन.रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव.

सोमवार 8 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून मोटारीने गुरुद्वाराकडे प्रयाण. सकाळी 10.45 ते 11.15 वा. हुजूर साहिब गुरुद्वारा येथे राखीव. सकाळी 11.15 ते 12.15 वा. खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी राखीव. दुपारी 12.15 ते 12.45 नांदेड मनपा अंतर्गत शहरातील उत्तर मतदार संघातील मुलभूत सुविधा कामांचे भूमीपुजन. स्थळ- शिवमंदिर, कॅनाल रोड, तरोडा नाका, नांदेड . हिंगोली जिल्हा सीमा ते आलेगाव निळा नांदेड व परभणी जिल्हा सीमा ते पुर्णा नांदेड रस्त्याच्या दुपदरीकरणाचे भूमीपुजन. स्थळ- वाय पॉईंट, छत्रपती चौक नांदेड . आसना नदीवरील पासदगाव जवळील पूलाचे भूमीपुजन. स्थळ- पासदगाव नांदेड.  नांदेड उत्तर मतदार संघातील पुरग्रस्त बाधित भागाची पाहणी. संदर्भ-आमदार बालाजी कल्याणकर. दुपारी 12.45 ते 1.30 वा.भक्ती लॉन्स, नांदेड येथे मेळावा. दुपारी 1.45 ते 2 वा. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी राखीव. दुपारी 2 वा. नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. सायं. 7 वाजता हिंगोली येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 7.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शेतकऱ्यांची चिंता – आ.बालाजी कल्याणकर 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांची चिंता असल्याने नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असल्याची माहिती आ.बालाजी कल्याणकर यांनी पत्रकारांना दिली. या दौऱ्यात अनेक कामाचे उदघाटन होणार आहे.नांदेड महानगर पालिकेसाठी अतिरिक्त निधीची मागणी मी करणार आहे आणि तो निधी मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.कल्याणकर यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *