नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्ताने नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व पोलीस विभाग, विविध शाखा, प्रत्येक पोलीस ठाणे आणि प्रत्येक उपविभाग यांच्या माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये शालेय महाविद्यालय स्तरावर जावून विविध प्रकारचे प्रबोधन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पोलीस विभागातील वेगवेगळ्या शाखा, त्यांचे कार्य माहितीच्या स्वरुपात दिले जाणार आहे. मुली व महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी दामिनी पथक, भरोसा सेल यांच्यासह वेगवेगळे पथक शाळा व कॉलेजमध्ये जावून विद्यार्थी , विद्यार्थींनींंना सायबर गुन्ह्यांची माहिती देतील. मुलींसाठी बॅड टच, गुड टच कसे ओळखावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वरिष्ठ नागरीकांना आपल्या अडचणीच्यावेळी देण्यात येणारी मदत तसेच नागरीक आणि मुलांमुलीकरीता वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. पोलीस विभागाच्यावतीने जनतेला अडचणीच्यावेळी तात्काळ मदत देण्यासाठी डायल 112 हे वाहन कार्यान्वीत करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर 112 या वाहनाचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. याची माहिती सर्वांसाठी देण्यात येणार आहे. तसेच शाळा, कॉलेज येथील विद्यार्थ्यांसाठी शस्त्रांची माहिती सुध्द देण्यात येणार आहे. 20 जुलै 2022 पासून ते 14 ऑगस्ट 2022 पर्यंत 75 किलो मिटर दौडचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक कार्यालय आणि जिल्ह्यातील हजर संख्येच्या 20 टक्के पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार दररोज यामध्ये भाग घेत आहेत. 14 ऑगस्ट 2022 रोजी 10 किलोमिटर दौडचे आयोजन करून एकूण 75 किलो मिटर दौड य, कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.