नांदेड(प्रतिनिधी)-अवैध पिस्तुल बाळगणाऱ्या तीन युवकांना अटक करून स्थानिक गुन्हा शाखेने त्यांच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दि.6 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या गुप्त माहिती आधारे कोणी तरी युवक नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढवळे कॉर्नरजवळ पिस्तुल बाळगुन उभा आहे. त्यानुसार पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांची परवानगी घेवून चिखलीकर यांनी आपले मातहात पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, गोविंदराव मुंडे, पोलीस अंमलदार सुरेश घुगे, संजय केंद्रे, बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ, बालाजी यादगिरवाड, दिपक ओढणे, राजेश सिटीकर, दासरवार, हेमंत बिचकेवार, राजु पुल्लेवार, बजरंग बोडके, दशरथ जांभळीकर आदींच्या पथकाला तिकडे पाठवले.
तेथे पोलीस पथकाने क्षितीज प्रताराव मोरे (19) रा.टेळकी ता.लोहा ह.मु.सिडको नांदेड यास पकडून त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल सापडले. हे गावठी पिस्टल शुभम अनिलराव कदम (21) रा.जानापूरी आणि संतोष प्रभाकर कदम (21) रा.डेरला यांनी दिल्याचे सांगितले. या तिघांविरुध्द पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 482/2022 भारतीय हत्यार कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने गावठी पिस्तुलसह तीन युवक पकडले