नांदेड (प्रतिनिधी)-काम करतांना दक्षता न घेतल्याने काय भयंकर चुक होवू शकते याचे उदाहरण देगलूर तालुक्यातील बल्लूर या गावात समोर आले. या गावातील एक आई, वडील आणि त्यांचा पूत्र असे तिघेे जण पेट्रोलच्या भडक्यात जळून मरण पावले आहेत.
स्वाती सुर्यकांत सक्रप्पा यांनी दिलेल्या खबरीनुसार बल्लूर गावात 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 ते 7.30 वेळेदरम्यान त्यांचे वडील पिचकारीमध्ये पेट्रोल टाकत होते. त्यावेळी वडीलांच्या तोंडात असलेली बिडी पेट्रोलवर पडली आणि पेट्रोलचा भडका होवून आई गंगुबाई सुर्यकांत सक्रप्पा (50) आणि भाऊ कपील सुर्यकांत सक्रप्पा (22) आणि वडील सुर्यकांत (52) असे तिघ जण पेट्रोलच्या भडक्यात भाजून मरण पावले आहेत. देगलूर पोलीसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यू क्रमांक 22/2022 दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक पुनम सुर्यवंशी हे करीत आहेत.
आई-वडील आणि पुत्राचा पेट्रोल भडक्यात मृत्यू