नांदेड(प्रतिनिधी)-हेमंत हा गद्दार आहे, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, पीस बाल्या आणि संतोष बांगर यांना बिघडविण्यात हेमंतचा हात आहे त्यानेच आपल्या काही पाठवलेल्या लोकांसोबत मिळून नांदेड जिल्ह्याची शिवसेना अशोक चव्हाणांच्या घरी जावून विक्री केल्याचा खळबळजनक आरोप माजी खा.सुभाष वानखेडे यांनी केला.
शिवसेनेचे मराठवाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन, माजी आ.नागेश पाटील आष्टीकर मनपा माजी स्थायी समिती सभापती औरंगाबादचे राजू वैद्य, परभणीचे माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे, लातूरचे माजी जिल्हाप्रमुख पप्पु कुळकर्णी, प्रकाश मारावार, भुजंग पाटील,धोंडू पाटील, रामगडीया, हरकारे, निकिता चव्हाण, निकिता शहापूरवार, वत्सला पुयड पाटील, रोहिदास चव्हाण, पप्पु जाधव, मुकुंद जवळगावकर यांच्यासह सुभाष वानखेडे उपस्थित होते. शिवसेनेची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नांदेड जिल्ह्यात संततधार पावसाने आणि कांही ठिकाणी ढगफुटीने पुर्णपणे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले आहे. खरे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेडला आले होते. त्यांनी ओला दुष्काळी जाहीर करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण तसे न करता इतर कामासाठी ते आले, अनेक कार्यक्रम रद्द झाले. या सर्व घटनाक्रमात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध व्यक्त करतो अशा शब्दात सुभाष वानखेडे यांनी आपले मत व्यक्त केले. या संदर्भाने 15 ऑगस्ट रोजी शिवसेनेची बैठक होणार असून त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका तहसील कार्यालयावर रुमणे मोर्चे काढू, प्रशासनाने घेतलेले झोपे सोंग त्यांना सोडायला लावू आणि त्यांना जागे करू यासाठी आजची बैठक होती असे सुभाष वानखेडे म्हणाले.
शिवसेनेशी गद्दारी करून संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे मंत्री झाले आहेत. त्यांच्यावरील गंभीर आरोप पाहता त्यांना मंत्री पदाची शपथ घेता येत नाही. पण त्यांनी घेतली आहे. जी कांही त्यांच्याबद्दलची चौकशी आहे ती पुर्ण करायला हवी. पुजा चव्हाण हे प्रकरण पत्रकार मंडळींनी पुन्हा एकदा पुर्णपणे उघड करून दाखवायला हवे. जेणे करून संजय राठोडचे सत्य लपणार नाही.
हेमंत हे रस्त्यावरचा टपोरी त्याच्याकडे वाम मार्गाने एवढी जमवलेली संपत्ती, काळा पैसा गोरा करण्याचा धंदा केला मग हेमंतची ईडी चौकशी का झाली नाही असा प्रश्न सुभाष वानखेडे यांनी उपस्थित केला. हेमंत विरुध्द देशद्रोहाचा गुन्ह दाखल व्हायला हवा. कारण नोटा बदलीमध्ये शासनाच्या निर्णयाविरुध्द त्याने काळ्याचा गोरा करण्याचा धंदा केला. याप्रसंगी त्यांच्याबद्दल हेमंत पाटील यांनी बोलले उद्गार विचारले असता सुभाष वानखेडे म्हणाले की, मी पक्ष सोडला तेंव्हा सुध्दा म्हणालो होतो की, मी काही व्यक्तीगत कारणामुळे पक्ष सोडला आहे. पण पक्षाशी गद्दारी करणार नाही. उध्दव ठाकरे यांनी आवाज देताच मी गेलो आणि पक्षात प्रवेश घेतला. पाठीत खंजीर खुपसण्याचे काम मी केले नाही. मी छत्रपतीची औलाद आहे असे सुभाष वानखेडे म्हणाले. बालाजी कल्याणकरला मी नगरसेवक म्हणून निवडूण आणले आहे. हेमंतनेच संतोष बांगर आणि पिस बाल्या(आ.बालाजी कल्याणकर) यांना बिघडवले आहे. हिंगोली येथे झालेल्या संतोष बांगर यांच्या कार्यक्रमाची चिरफाड करतांना सुभाष वानखेडे म्हणाले त्या ठिकाणच्या गर्दीमध्ये हिंगोलीचा कोणी माणुस नव्हता तर सर्व लोक जिंतूर-परभणी येथून आणले होते. काही दिवसातच घोडा मैदान समोर आहे पाहुन घेवू. कोण जिंकत. नांदेड जिल्ह्याची शिवसेना वरुन पाठवलेल्या काही लोकांना हाताशी धरून हेमंतनेच अशोक चव्हाणांच्या घरी जावून विक्री केल्याचा आरोप सुभाष वानखेडे यांनी केला. मी एवढे आरोप करत आहे कोणी मला एक हजार रुपये दिले असतील असे माझ्यासमोर सांगावे मी त्याला शंभर हजार रुपये देईल, मी गद्दार नाही.
सध्याच्या कालखंडातील केंद्र शासनाबद्दल बोलतांना सुभाष वानखेडे म्हणाले, इंग्रजांपेक्षा जास्त अत्याचार सध्याचे केंद्र शासन करत आहे. माजी फक्त एवढीच विनंती आहे की, पोलीसांचा उपयोग आमच्या विरुध्द करू नका सर्व शिवसैनिक खंबीर आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरुध्द, आमच्याविरुध्द काही दुरउपयोग करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र आम्ही सुध्दा नागवेच आहोत.

“काय तो बोंढारकर’
नांदेड जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याबद्दल बोलतांना सुभाष वानखेडे म्हणाले “काय त्याचे तोंड’,” काय त्याचे दात’,” काय त्याची कंबर’ अशा व्यक्तीला आपला बोलता धनी राहावा म्हणून हेमंतनेच जिल्हाप्रमुख केले होते. बरे झाले तो गेला.
कोठे आहे एलसीबी
नांदेड जिल्ह्यातील माजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अयोग्य दखल घेतल्यामुळे सध्याच्या परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुध्द बोलतांना सुभाष वानखेडे म्हणाले नांदेड जिल्ह्यात नॉन करप्ट पोलीस अधिक्षक येणार नाही तो पर्यंत ही अवैध धंद्यांची मालीका बंद होणार नाही. याप्रसंगी कोठे आहे एलसीबी असा प्रश्न सुध्दा सुभाष वानखेडे यांनी उपस्थित केला.