नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस ठाणे भाग्यनगरच्या हद्दीत दोन मेडीकल फोडून चोरट्यांनी त्यातून 54 हजार रुपये रोख रक्कम आणि कांही धनादेश चोरले आहेत. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक रुम फोडून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीचे संगणक चोरले आहेत. कंधार येथून एक 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शाळेचे स्टेशनरी साहित्य टेम्पोसह चोरून नेले आहे. वजिराबाद आणि इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरीच्या घटना नोंद आहेत.
विश्र्वास बालाजीराव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 ऑगस्टच्या रात्री 11 ते 9 ऑगस्टच्या पहाटे 6 वाजेदरम्यान वर्कशॉप कॉर्नर येथील विश्र्वास मेडिकल दुकान फोडण्यात आले. त्या दुकानाचे शटर अर्धवट वाकवून त्यातून 50 हजार रुपये चोरले. तसेच त्यांचे मित्र शुभम अनंतराव चाभरेकर यांचे शुभम मेडिकल फोडून त्यातून 4 हजार रुपये किंमतीची चिल्लर रक्कम चोरील आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक वाठोरे अधिक तपास करीत आहेत.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 7 ऑगस्टच्या रात्री 9.30 ते 8 ऑगस्टच्या पहाटे 9.30 वाजेदरम्यान मोहम्मद अकबर मोहम्मद अलताफ यांनी आपल्या मालकीचा टेम्पो क्रमांक एम.एच.23 एच.9392 हा 1 लाख रुपये किंमतीचा मालवाहू टेम्पो उभा केला होता. त्यामध्ये पोतदार हायस्कुलची इयत्ता 1 ली ते 5 वीपर्यंतच्या वह्या 1 लाख 50 हजार रुपयांच्या आणि इतर स्टेशनरी साहित्य चोरट्यांनी टेम्पोसह चोरून नेले आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक घुगे हे करणार आहेत.
श्रीराम पंडीत जाधव यांची शाहुनगर जॉकी शोरुमजवळ राहण्याची खोली आहे. 8 ऑगस्टच्या सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी त्या रुमचे कुलूप तोडले आणि आतील 20 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप संगणक चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
शेकापुर ता.कंधार येथून सौ.गवळण माधव मुंडे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एन.6588 ही 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 4-5 ऑगस्टच्या रात्री चोरीला गेली आहे. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सानप अधिक तपास करीत आहेत.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पायी जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या वैशाली कृष्णा गुंजरगे यांच्या पर्समधील 14 हजार रुपये किंमतीचा मोबाईल 8 ऑगस्टला सायंकाळी 7.15 ते 7.20 अशा 5 मिनिटात कोणी तरी चोरला आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार धोंडीराम केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
चंद्रकांत गंगाधर बुरूडे हे 2 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.45 वाजता इतवारा हद्दीतील एका इटली सेंटरवर न्याहरी करत असतांना कोणी तरी त्यांचा 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरला आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार हबीब चाऊस अधिक तपास करीत आहेत.
पोतदार हायस्कुलचे शालेय साहित्य टेम्पोसह चोरीला गेले