नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी एका हुक्का पार्लरवर धाड टाकून तेथून 5100 रुपयांचे साहित्य जप्त केले आहे आणि पाच जणांविरुध्द गुन्हा दालख केला आहे.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळटेकडी जवळ एक हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर इतवारा पोलीसांनी पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात तेथे धाड टाकली. त्या ठिकाणी वेगवेगळ्या फेल्वर्समध्ये तंबाखु जन्य वस्तू टाकून हुक्का ओढणे सुरू होते. तेथे आग लावलेली होती. त्यामुळे ते मानवी जीवनास धोकादायक होते. याबाबत पोलीस अंमलदार एकनाथ मोकले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेहबाज खान रा.लेबर कॉलनी, शेख तोहिद शेख अब्बु तालेब रा.मंडई, शेख सौरभ अली उर्फ सम्मी अली सफीक अली रा.मंडई, शेख शरीफुल, शेख ईस्माईल रा.सैदान मौहल्ला , शेख मुनीरुल इस्लाम शेख रमजान अली रा.पोस्टऑफीसजवळ या सर्वांविरुध्द गुन्हा क्रमांक 207/2022 दाखल केला आहे. त्यात भारतीय दंड संहितेची 285, 336, 34 आणि सिगरेट व इतर तंबाखु उत्पादने सुधारणा अधिनियम कलम 4(ए), 21(ए) जोडण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार शेख रसुल यांच्याकडे देण्यात आला आहे.
इतवारा पोलीसांनी हुक्का पार्लरवर धाड टाकली