नांदेड,(प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेने कळवल्या प्रमाणे नांदेड नागपूर व्हाया मांजरी या मार्गावरील रेल्वे पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने आजची पूर्णा पाटणा रेल्वे गाडी वळवण्यात आली आहे.नांदेडच्या प्रवाशानी लवकरात लवकर पुर्णा येथे जाऊन गाडी पकडायची आहे.
पूर्णा – पटना चालणारी रेल्वे गाडी क्रमांक १७६१० आज दिनांक ११ ऑगस्ट रोजी नेहमीच मार्ग पूर्णा -नांदेड-हिम्यातनगर-आदिलाबाद – वणी- मांजरी वर्धा अशी धावणार नाही,कारण मांजरी-वणी दरम्यान असलेल्या रेल्वे पुलावरून पावसाचे पाणी वाहत आहे. म्हणून आजची गाडी क्रमांक १७६१० पूर्णा – पटना हि पूर्णा – हिंगोली- वाशीम-अकोला – बडनेरा मार्गे धावणार आहे.तेव्हा या गाडीने नांदेड येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लवकरात लवकर पूर्णा येथे पोहचावे असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे. पूर्णा येथून आजची पटना गाडी दुपारी २.१० सुटणार आहे.