नांदेड(प्रतिनिधी)-शासनाच्या सेवेत विभागीय परिक्षांमधून पदोन्नतीसाठी पात्र होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने शुध्दीपत्रक जारी केले आहे. आज दि.11 ऑस्ट रोजी जारी झालेल्या या शुध्दीपत्रकावर सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव प्रशांत नावगे यांची स्वाक्षरी आहे.
शासनाने पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी यापुर्वी सुट्ट जाहीर केली आहे. त्यामध्ये सुध्दा शासनाने नवीन सुधारणा केली असून आता शासन सेवेत कर्मचाऱ्यांची 15 वर्ष सेवा पुर्ण झाल्याचा दिनांक किंवा कर्मचाऱ्याच्या वयाची 50 वर्ष पुर्ण झाल्याचा दिनांक यामध्ये जे नंतर घडेल त्यानंतर लगतचा दिनांक कर्मचाऱ्यास पदोन्नतीसाठी विहित केलेली विभागीय परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सुट देण्याचा दिनांक समजला जाईल. यामुळे आता परिक्षेतील सुट्ट देण्याबाबतच्या पुर्वीच्या शासन निर्णयात शासनाने असा नवीन बदल घडविला आहे. हे शासन शुध्दीपत्रक संगणक संकेतांक 202208111437238507 नुसार शासनाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.
राज्यातील शासकीय कर्मचार्यांना पदोन्नतीमध्ये विभागीय परिक्षा आणि प्रशिक्षणातून सवलत दिल्याचे शुध्दीपत्रक शासनाने आज जारी केले आहे. खरे तर या प्रकरणात सर्वात मोठी कामगिरी सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक मुकूंद दायमा यांची आहे. त्यांनी सर्व कार्यवाही पोलीस विभागातील कर्मचार्यांसाठी लढली होती. त्यासाठी त्यांना उच्च न्यायालय, पोलीस महासंचालक यांच्या दरबारी अनेकदा हजेरी लावावी लागली. त्यांनी पोलीस विभागासाठी केलेल्या या मेहनतीचे फळ आता राज्यातील सर्व कर्मचार्यांना मिळणार आहे असे या शुध्दीपत्रकावरून दिसते.