नांदेड(प्रतिनिधी)-रक्षाबंधनाच्या दिवशी आज सकाळी 7.30 वाजता कॅनॉल रोडवर वॉकींग करणाऱ्या एका महिलेचे अडीच तोळे सोन्याचे शॉटगंठण, 70 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी तीन चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेले आहे. महिलेच्या नातलगांनी सांगितले की, पोलीसांनी त्यांच्यासोबत उलट तपासणी केली. ज्यामध्ये ऐवढे सोने घालून बाहेर फिरतात काय असा प्रश्न विचारला.
कविता नरेश पबितवार या 45 वर्षीय महिला भावसार चौकातून वॉकींग करत कॅनॉल रोड मार्गे मासे बाजाराजवळ आल्या असतांना मोटारसायकलवर आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीचे अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण बळजबरीने तोडून नेले आहे. भाग्यनगर पोलीसांनी याबाबत गुन्हा क्रमांक 83/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 34 नुसार दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.डी. कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय जनता पार्टीचे संतोष परळीकर यांनी या चोरट्यांना लवकर बेड्या ठोका अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे. या महिलेच्या नातलगांनी सांगितले की, महिला गुन्ह्याची नोंद करण्यासाठी गेल्या असतांना पुर्वी डी.बी.पथकात असलेल्या भाग्यनगरच्या एका पोलीस अंमलदाराने या महिलेला धीर देण्याऐवजी ऐवढे दागिणे घालून मंदिरला जाण्याची गरज काय, भाजीपाला खरेदी करतांना सुध्दा लोक महागडा मोबाईल घेवून जातात. तेथे काय गरज अशी उलट तपासणी सुरू केली. आम्हाला एवढेच काम आहे काय असे उत्तर त्या पोलीसाने दिले.
रक्षाबंधनाच्या दिवशी महिलेचे 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण तोडले