लिंकवर क्लिक केल्याने महिलेची 99 हजार 997 रुपयांची ऑनलाईन फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-पुन्हा एकदा लिंकवर क्लिक करून बेस ऍप डाऊनलोड करणाऱ्या एका महिलेच्या बॅंक खात्याून 99 हजार 997 रुपये वर्ग करून तिची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे.
सरपंच नगर येथे राहणाऱ्या अश्र्विनी अमित कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मोबाईल क्रमंाकवर व्हॉटसऍप संकेतस्थळावर एक लिंक पाठवून 10 रुपये पाठविण्यास सांगण्यात आले. तेंव्हा त्यांचे दहा रुपये पुढे गेले नाहीत म्हणून त्यांनी त्या क्रमांकावर हाय असा संदेश पाठवला. तेंव्हा त्या नंबरच्या आरोपीने गुगल ऍप प्लेस्टोअरमधून बेस ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर ते ऍप मोबाईलमधून डिलीट करण्यास सांगितले. एवढ्यात अश्र्विनी कुलकर्णी यांच्या वेगवेगळ्या बॅंक खात्यातून 99 हजार 997 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. अश्र्विनी कुलकणी र्यांना मोबाईल क्रमांक 9883815643 च्या धारकाने संदेश पाठवून ही फसवणूक केली आहे. भाग्यनगर पोलीसांनी या  प्रकरणी गुन्हा क्रमांक 282/2022 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक सुधाकर आडे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *