शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने गणेशनगर वाय पॉईंट येथे चोर पकडला;एक लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड,(प्रतिनिधी)- शिवाजीनगर पोलिसांनी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. १९ वर्ष वय असलेल्या एका युवकाला पकडून चोरी केलेला सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक १० ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध प्रमुख पोलीस उप निरीक्षक मिलिंद सोनकांबळे हे आपले सहकारी पोलीस अंमलदार शेख इब्राहिम,रविशंकर बामणे,देवसिंह सिंगल,दिलीप राठोड,शेख अझहरोद्दीन,दत्ता वडजे यांच्यासोबत गस्त करीत असतांना त्यांना गुप्त खबर प्राप्त झाली की,जबरी चोरी करणारा एक गुन्हेगार सध्या गणेशबगर वाय पॉईंट येथे थांबला आहे. पोलीस पथकाने तेथे जाऊन आपल्या माहितीनुसार त्या युवकाला ताब्यात घेतले.त्याचे नाव सय्यद समीर सय्यद समी (१९) रा.लेबर कॉलोनी नांदेड असे आहे.पोलीस पथकाने त्याची अंग झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे एक मोबाईल आणि एक पिवळ्या धातूची चैन भेटली.त्या युवकाने सांगितल्या प्रमाणे १५ दिवसांपूर्वी मोबाईल संकेत हॉस्टेल कडे जाणाऱ्या रस्त्यावर पायी चालत जाणाऱ्या एका माणसाचा मोबाईल हिसकावून घेतलेला आहे.तसेच ४-५ महिन्यांपूर्वी दि मार्ट रस्त्यावर एका माणसाची चैन बळजबरीने ओढून घेतली आहे.

पोलीस ठाणे विमानतळ येथे मोबाईल चोरी बाबत गुन्हा क्रमांक २५७/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३९२ आणि ३४ नुसार दाखल आहे.मिलिंद सोनकांबळे यांनी एका अहवालानुसार पकडलेला चोर सय्यद समीर सय्यद समीला पुढील तपासासाठी विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आदींनी चोरीचा गुन्हा उघड करून १ लाख ७५ हजारांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करणाऱ्या शिवाजीनगर पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *