नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदेड शहरात एआयएमआयएम या राजकीय पक्षाच्यावतीने 15 ऑगस्ट रोजी शहरातून तिरंगा रॅली काढली जाणार असल्याची माहिती एमआयएम नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एमआयएम कार्यालयात राज्य महासचिव सय्यद मोईन, मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला, जिल्हाध्यक्ष अमजद बेग, शहराध्यक्ष साबेर चाऊस यांनी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताचा 75 वर्षीय स्वातंत्र्य दिन अमृतमहोत्सव म्हणून साजरा होत आहे. या निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा एमआयएम पक्षाला सार्थ अभिमान आहे. एमआयएम पक्ष नेहमीच भारताच्या उत्कृर्षात हातभार लावणारा पक्ष आहे. भारतीय स्वतंत्रता संग्रामात आपल्यासाठी बलीदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठीचा हा दिवस आहे. या निमित्त एमआयएम पक्षाच्यावतीने पक्षाच्या देगलूर नाका कार्यालयातून 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता एक सायकल रॅली काढली जाणार आहे. या सायकल रॅलीमध्ये 500 ते एक हजार दुचाकी गाड्या सहभागी होतील असे सांगितले.
या रॅलीमधील गाड्यांच्या सायलेंसरमध्ये कोणताही बदल करू नये, कर्कश हॉर्न वाजू नये अशा सुचना आम्ही युवकांना दिल्या आहेत. ही रॅली, देगलूर नाका, चुना भट्टी, इदगाह कमान, देगलूर नाका चौक, पहिलवान टी हाऊस, बर्की चौक, जुना मोंढा वजिराबाद, शिवाजीनगर, श्रीनगर, राज कॉर्नर, पिरबुऱ्हान चौक, आनंदनगर, महाराणा चौक, नमस्मार चौक, माळटेकडी पुल आणि देगलूर नाका येथील एमआयएम कार्यालय येथे येवून समाप्त होईल. या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांनी वेळेत हजर राहावे असे आवाहन केले आहे.
15 ऑगस्ट रोजी एमआयएम पक्षाची तिरंगा रॅली