नांदेड(प्रतिनिधी)-एका ट्रकमध्ये आलेल्या खुर्च्या किंमत 2 लाख 13 हजार 975 रुपयांच्या उतरून घेतल्या आणि पैसे देण्यास नकार दिला म्हणून दहा मोटारसायकल चालक आणि दोन नावे अशा 12 जणांविरुध्द भोकर पोलीसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नागराजू भिक्षापती वनमा हा ट्रक चालक आहे. तो तेलंगणा राज्यातील आहे. दि.10 ऑगस्ट रोजी तो ठरल्याप्रमाणे 1337 नग खुर्च्या दर 175 रुपये प्रमाणे घेवून आला. त्याची एकूण किंमत 2 लाख 13 हजार 975 रुपये आहे. त्या खुर्च्या भोकर येथे उतरल्या त्यावेळी हुकूम बंजारा, अंकित आणि 10 दुचाकी चालक तेथे हजर होते. त्यांनी 1337 खुर्च्या उतरवून घेतल्या आणि पैसे देण्यास नकार दिला. भोकर पोलीसांनी हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 34 नुसार क्रमांक 272/2022 दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार जाधव यांच्याकडे दिला आहे.
2 लाख 13 हजार 975 रुपयांच्या खुर्च्या घेवून पैसे देण्यास नकार