नांदेड(प्रतिनिधी)-काल रक्षाबंधनाच्या दिवशी पोलीस दल बंदोबस्त करण्यात व्यस्त होते. पण आज स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यंानी आपल्या सहकारी महिला पोलीसांकडून रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करून आनंद व्यक्त केला.
रक्षाबंधन हा एक प्रतिकात्मक सण असला तरी त्याचे महत्व आजही संपलेले नाही. काही जाती धर्मांमध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणे याची पध्दत अस्तित्वात नाही. पण आम्ही नेहमीच म्हणत आलो की, सर्व धर्म समभावाची चर्चा व्यासपीठांवर जरूर होते. पण प्रत्यक्षात ती कोठेच दिसत नाही. पण द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या कार्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम सलग दुसऱ्या वर्षी साजरा करून कोठे आहे जाती धर्म असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत विविध जाती धर्माचे असंख्य अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. द्वारकादास चिखलीकर यांनी मागील वर्षी सुध्दा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपल्या कार्यालयात घडविला होता आणि याही वर्षी घडवला. आपल्या कार्यालयातील महिला पोलीस अंमलदार हेमवती भोयर, पंचफुला फुलारी, किरण बाबर, शेख महेजबीन यांच्या हस्ते सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या हातावर रक्षा बांधून घेतल्या. यावरून सर्व धर्म समभाव पाहायचा असेल तर तो पोलीस दलात पाहावा असे आम्ही मागील तीस वर्षापासून सांगत आलोत. याचाच प्रत्यय पोलसी निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी दुसऱ्यांदा आपल्या कार्यालयात घडवला. कामकाज करतांना काही बाबींमध्ये अधिकारी मंडळी अंमलदारांना रागवतात. पण तो राग कामापुरता असला पाहिजे इतर बाबींमध्ये त्या रागाचा समावेश नसावा असे अपेक्षीत आहे. पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या वागण्यातून पुन्हा एकदा उत्कृष्ट मानवतेचे दर्शन घडले. याप्रसंगी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, गोविंदराव मुंडे,आशिष बोराटे, जसवंतसिंघ शाहु, पोलीस अंमलदार संजय केंद्रे, बजरंग बोडके, अफजल पठाण, रवि बाबर, सुरेश घुगे, सचिन सोनवणे, दशरथ जांभळीकर, देविदास चव्हाण, शिवसांब घेवारे, गजानन बैनवाड, गंगाधर कदम, हनुमानसिंह ठाकूर, मारोती तेलंग,संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके आदी उपस्थित होते.
एलसीबीमध्ये घडलेल्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम म्हणजे सर्व धर्म समभाव