नांदेड(प्रतिनिधी)-मराठा आरक्षण, ओला दुष्काळ आणि ई.डब्ल्यू.एस.प्रमाणपत्राच्या संदर्भाने आज छावा संघटनेने बैलगाडीत मोर्चा काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवले.
मराठा आरक्षण, ओला दुष्काळ आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्याबाबत प्रश्न घेवून आज छावा संघटनेने एका बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते. बैलगाडीमध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले आणि हा मोर्चा आयटीआयपासून सुरू झाला आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपला. त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मागच्या सरकारने दिले होते. पण महाविकास आघाडीने मराठा समाजाला पुन्हा डावलले. आपल्याकडून मराठा समाजाला मोठ्या आशा आहेत असे या निविदेनात नमुद आहे. आपण मुख्यमंत्री झालात आणि राज्यभर पावसाने शेतकऱ्यांना त्रास दिला. जास्त पाऊस झाल्याने सोयाबीन, कापूस, मुग, उडीद, तुर व इतर ठिकाणचे नुकसान झाले आहे. या सर्वांना आर्थिक पाठबळ देवून दिलासा द्यावा. मागी युती सरकारने दिलेले मराठा आरक्षण पुन्हा एकदा आरक्षण देवून समाजाविषयीची आपली भावना दाखवावी. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यासाठी मराठा विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. त्याबाबत प्रशासनाला योग्य सुचना द्याव्यात. मोर्चाच्या सोबत पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार आणि त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. शहरातून फिरणाऱ्या बैलगाड्या आणि त्याही मोठ्या संख्येत पाहुन अनेकांनी याचा आंनद घेतला. अनेक दिवसांपासून बैलगाडी पाहणे हा प्रकार दुरापास्त झाला आहे.
