
नांदेड(प्रतिनिधी)-रक्तदान शिबिर आयोजित करून बाली कांबळे यांनी आपला जन्मदिवस साजरा करतांना रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक कार्याला हातभार लावला असे प्रतिपादन आ.मोहन हंबर्डे यांनी केले. या कार्यक्रमात बाली कांबळे मित्र मंडळाने त्यांच्या वजनाऐवढे शालेय साहित्य भेट दिले. त्या शालेय साहित्याचा उपयोग बाली कांबळे यांनी गरजवंत विद्यार्थ्यांसाठी केला.
सुरूवातील छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बाली कांबळेच्या आई पुष्पाबाई नारायण कांबळे यांच्या प्रतिमांना अभिवादन करून मान्यवरांनी रक्तदान शिबिरास सुरूवात केली. याप्रसंगी व्यासपीठावर आ.मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल, ज्येष्ठ नागरीक संभाजीराव जोंधळे, आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहुल दादा प्रधान, भाजप नेते दिलीप कंदकुर्ते, धनेगावचे माजी सरपंच दिलीप दादा गजाभरे, सामाजिक कार्यकर्ते कैलास सावते, डॉ.अजिंक्य गायकवाड, प्रितम जोंधळे, ऍड. दिपक शर्मा, संजय जोंधळे, विकी भाऊ सेवडीकर, कंथक सुर्यतळ आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना आ.मोहन हंबर्डे यांनी सांगितले की, रक्तदान शिबिर आयोजित करून बाली कांबळे यांनी या जगात आपला जन्म समाजाच्या सेवेसाठी झाला आहे असे दाखवून दिले. त्यांच्या मित्र मंडळीने त्यांच्या वजनाऐवढे शालेय साहित्य भेट देवून गरजवंत मुलांची सोय केली. आपला वाढदिवस साजरा करतांना सामाजिक काम त्यात जोडले जावे असा प्रयत्न करून बाली कांबळे यांनी एक चांगला आदर्श निर्माण केला असे रामप्रसाद खंडेलवाल यांनी सांगितले. बाली कांबळे यांच्या कामातून त्यांनी जमवलेला प्रेमाचा समुदाय एवढा मोठा आहे की, त्याची बरोबरी महासागरासारखी दिसेल असे राहुल प्रधान यांनी सांगितले.

या रक्तदान शिबिरात जिजाई रक्तपेढी आणि शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीच्या डॉक्टर्स आणि तंत्रज्ञांनी मेहनत घेतली. रक्तदान शिबिरात 400 रक्तदात्याने रक्तदान करून बाली कांबळे चा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद लिंबाळे , सम्राट आढाव, आकाश चावरे, कुणाल कांबळे , आशुतोष कांबळे, आदर्श कांबळे, प्रसेंनजित अवताडे संतोष कांबळे , शैलेश कांबळे, अरुण वाघमारे, दिलीप वंजारे, नितीन लोहकरे, भैय्या कांबळे, बादल जोंधळे, माधव गायकवाड आदींनी मेहनत घेतली.
