नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रध्वजावर टिपू सुलतानचे चित्र लावून राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी ईस्लापूर पोलीसांनी किनवट तालुक्यात राहणाऱ्या तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
ईस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रघुनाथ शेवाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास त्यांना माहिती मिळाली की, भारतीय राष्ट्रध्वजावर टिपू सुलतानचे चित्र तयार करुन राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला आहे. तयार केलेला असा हा प्रकार आपल्या मोबाईलद्वारे स्टेटसमध्ये ठेवला. त्यामुळे धार्मिक तेढ आणि सामाजिक अशांतता तयार होवू शकते. पोलीसांनी त्वरीत या प्रकरणी असे कृत्य करणारे शेख अब्दुल रहिम, अलीम खान सलीम खान, समिर रोशन खान सर्व रा.शिवणी ता.किनवट यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 79/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 505 आणि राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम 1971 च्या कलम 2 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे.
राष्ट्रध्वजावर टिपु सुलतानचे चित्र लावणाऱ्या तीन युवकांवर गुन्हा दाखल