नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस विभागातर्फे 75 व्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवानिमित्त दहा किलो मिटर दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या दौडमध्ये सरकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि सर्वसामान्य नागरीकांनी सुध्दा मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
दि.13 ऑगस्ट रोजी ही दहा किलो मिटरची दौड सकाळी 6 वाजता जुना मोंढा टावर येथून सुरू होईल. या दौडचा मार्ग वजिराबाद, कला मंदिर, आयटीआय वर्कशॉप, राज कॉर्नर, पुन्हा यु टर्न घेवून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, तिरंगा चौक मार्गे पोलीस मुख्यालयात समाप्त होईल. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 13 ऑगस्ट 2022 पर्यंत जुना मोंढा येथून दौड सुरू होण्याअगोदर नोंदणी करता येईल. जनतेने आमच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले आहे.
13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या दहा किलो मिटर दौडमध्ये जनतेने सहभागी व्हावे-प्रमोद शेवाळे