नांदेड(प्रतिनिधी)-एक महिला आणि एक आई-पुत्र अशा दोन जणांना अनुक्रमे पोलीस ठाणे भोकर हद्दीत आणि नरसी जुनेगाव येथे ठकसेनानी फसवणूक करून 1 लाख 75 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
भोकर तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी अंजली हनमंतराव लामेंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.12 ऑगस्ट रोजी भोकर शहरातील बिंदु कॉलेज रस्त्यावर दुपारी 1 ते 1 वाजेच्या पुढच्या वेळेत एक अनोळखी माणुस त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला तुम्ही घेतलेल्या सोन्याच्या नेकलेसवर तुम्हाला लक्की ड्रा लागला आहे. त्यानंतर त्याने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिणे 1 लाख 31 हजार 500 रुपयांचे वजन करण्यासाठी म्हणून काढायला लावले. तो अनोळखी व्यक्ती ते दागिणे खिशात ठेवून मोटारसायलवर बसून पळून गेला. भोकर पोलीसांनी या बाबत भारतीय दंड संहितेच्या कलम 420 प्रमाणे गुन्हा क्रमांक 278/2022 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक कांबळे अधिक तपास करणार आहेत.
दुसऱ्या एका घटनेत परशुराम विठ्ठल खांदाजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुने नरसीगाव ते मुखेड रस्त्यावरील गॅस एजन्सीजवळ असे घडले की, त्यांची पत्नी संगिता आणि मुलगा श्रावण यांना अनोळखी माणुस भेटला आणि म्हणाला सोनपापडीवर तुम्हाला स्कुटीची लॉटरी लागली आहे.तुम्ही स्कुटी घेता की, 70 हजार रुपये घेता तुमच्याकडे दोन तोळे सोने खरेदी केलेली पावती आहे काय, नसेल तर तुमच्याकडील दोन तोळे सोने द्या मी सोनाराकडून पावती तयार करून घेतो. संगीताने आपल्याकडील दोन तोळे सोन्याचे दागिणे 40 हजार रुपये किंमतीचे आणि एक मोबाईल 4 हजार रुपये किंमतीचा असे साहित्ये घेवून तो भामटा मुलगा श्रावणला सोबत घेवून गेला. श्रावणला तु येथे थांब मी पावती आणतो असे म्हणून पळून गेला. हा प्रकार 11 ऑगस्टच्या दुपारी 12.30 वाजेच्यासुमारास घडला. रामतिर्थ पोलीसांनी याबाबत भारतीय दंड संहितेच्या कलम 420 प्रमाणे गुन्हा क्रमांक 126/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनात शेख हे करणार आहेत.
दोन महिलांची फसवणूक करून ठकसेनांनी 1 लाख 75 हजार 500 रुपयांचा ऐवज केला लंपास