नांदेड(प्रतिनिधी)-ट्रकमधील तांदुळ राशनचा आहे आम्हाला 2 लाख रुपये द्या नसता पोलीस आणि तहसील कार्यालयाच्या कार्यवाहीला सामोरे जा अशी धमकी देवून 20 हजार रुपये बळजबरीने घेणाऱ्या तीन जणांविरुध्द भोकर पोलीसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
मोगल लुकमान बेग एजाज बेग रा.तळेगाव ता.उमरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भोकर येथे त्यांनी आपला ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.5660 मध्ये तांदुळ भरला आणि हा तांदुळ घेवून ते हिमायतनगरकडे निघाले असता मंजित कॉटन मिल समोरील बायपास रस्त्यावर चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.02 ई.एच.3292 ने त्यांचा ट्रक रोखला. ट्रकमधील तांदुळ राशनचा आहे. तुम्ही 2 लाख रुपये द्या नाही तर तहसील आणि पोलीस कार्यवाही करू अशी भिती दाखवून त्यांच्याकडून 20 हजार रुपये खंडणी वसुल केली. या गाडीमध्ये साई राठोड, लक्ष्मण आणि राजाराम ईबितवार सर्व रा.पोमनाळा ता.उमरी हे होते. हा प्रकार 12 ऑगस्टच्या सायंकाळी 5.45 वाजता घडला. भोकर पोलीसांनी या बाबत भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 341 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 275/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक दिगंबर पाटील हे करणार आहेत.
पोलीस आणि तहसील कार्यालयाची भिती दाखवून 20 हजारांची खंडणी