
नांदेड,(प्रतिनिधी)- पोलीस विभागाने आयोजित केलेल्या स्वातंत्र्याची ७५ किलोमीटर दौड या कार्यक्रमाची सांगता आज सकाळी जुना मोंढा टॉवर पासून १० ली;वमीटरची दौड करून झाला.या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.विपीन आणि पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
आज सकाळी ६ वाजता पोलीस विभागाने आपल्यावतीने आजोजित केलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या ७५ किलोमीटर दौड कार्यक्रमाची सांगत आज झाली.जिल्हाधिकारी डॉ.विपीन आणि पोलीस प्रमुख प्रमोद शेवाळे यांनी या दौडला हिरवा झेंडा दाखवला.
हि दौड पोलीस मुख्यालयात समाप्त झाली.या दौड मध्ये अपर पोल्स अधीक्षक निलेश मोरे,विजय कबाडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षक,सहायक पोलीस निरीक्षक,पोलीस उप निरीक्षक,अनेक महिला आणि पुरुष पोलीस अंमलदार,अनेक विध्यार्थी आणि विद्यार्थिनी,पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक युवक आई युवती सामील झाल्या होत्या.






