आपल्या हिंमती आणि किंमतीचा अंदाज कोणालाच लागू दिला नाही असे व्यक्तीमत्व पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर

पल्या जीवनात असे अनंत लोक असतात ज्यांना आपण वेळेसह विसरून जातो पण आपल्या जीवनात असेही काही लोक असतात ज्यांनी आपल्यासोबत व्यतित केलेला वेळ आणि त्याच्या आठवणी आपण कधीच विसरु शकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला आपण कधीच हरवु द्यायचे नसते. असेच एक व्यक्तीमत्व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर त्यांच्या जन्मदिनी त्यांचा हा सन्मान शब्द संग्रहातून करत आहोत.
डिसेंबर 2019 मध्ये नांदेड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेत पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांची नियुक्ती झाली. मागील दहा वर्षांचा ईतिहास पाहिला तर सलग दोन वर्ष या खुर्चीवर कोणताही पोलीस निरिक्षक थांबलेला नाही. द्वारकादास चिखलीकर यांच्यामध्ये असलेल्या पात्रतेमुळेच त्यांना आपली खुर्ची टिकवता आली. पावसाचे थेंब छोटे-छोटे असतात परंतू त्यांच्या निरंतर बसरत राहण्यामुळेच मोठ्या नद्यांना पुर येतो अशाच प्रकारे आपल्या जीवनात छोटे-छोटे परंतू निरंतर प्रयत्न द्वारकादास चिखलीकर यांना या खुर्चीवर कायम राहण्यास मदत करत गेले. त्यांनी आपल्या पुर्ण एलसीबीच्या कार्यकाळात शेकडोने गुन्हेगार जेलमध्ये टाकले. पोलीस विभागाचे काम करत असतांना कधीच आपल्या घरच्या जबाबदारीची चिंता त्यांना वाटली नाही. माझे कामच माझे दैवत आहे अशी भावना ठेवून त्यांनी केलेल्या प्रयत्नांना नेहमी यश येत गेले आणि त्यांचा प्रवास सुखकर राहिला. विहिर खणतांना विहिरीत काम करणारे काहीच कामगार असतात. परंतू काठावर अनेक लोक बसलेले असतात. त्यांना ते कामगार काय काम करत आहेत यामध्ये काही रस नसतो पण कोणत्या तरी भागातून पाणी बाहेर येते का याबद्दल काठावर बसलेल्या लोकांची ओढ असते. अशा पध्दतीचे अनेक अनुभव द्वारकादास चिखलीकर यांना आपल्या पुर्ण पोलीस सेवा काळात मिळाले असतील पण त्यांनी अनेकदा केलेल्या कामांमधून एकच नव्हे तर अनेक चांगले परिणाम बाहेर आणले. त्यामुळे आज त्यांचा प्रगतीचा मार्ग अनेक अडथळे आल्यानंतर सुध्दा रोखला गेला नाही. त्यात कोणी अडचण आणली असेल तरी अडचण आणणाऱ्याचीच फजीती झाली. सत्य हा असा दिवा आहे त्याला एखाद्या डोंगरावर ठेवले तरी त्याचा उजेड कमी असेल परंतू तो खूप दुरवरून पण दिसतो. अशाच या दिव्याच्या जन्मदिनी त्यांचा सन्मान करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.


आपले काम करत असतांना त्यांनी दोन वेळा गोळ्या झाडून गुन्हेगारांना अटक केली. त्या कामामध्ये काही चुक भेटते काय? हे शोधणारी बरीच मंडळी होती. पण कायद्याचा अभ्यास, आपण करत असलेल्या कामातील खरेपण याच्या जोरावर चिखलीकरांना कधीच मागे पाहावे लागले नाही. जबाबदारी स्विकारून द्वारकादास चिखलीकर यांनी दोन वेळा पोलीस ठाणे देगलूर, एकदा नांदेड ग्रामीण चालवले. त्यांना मिळालेल्या नेतृत्वाला त्यांनी कधीच हुकूमत म्हणून गाजवली नाही तर जबाबदारी स्विकारत सर्व लोकांना योग्य दिशा दाखवत प्रगती करण्याकडेच आपले लक्ष केंद्रीत केले. दिव्याची वात किटकांना जाळणे शिकते, संध्याकाळ सुर्याला मावळणे शिकते, प्रवासी ठेस लागते तेंव्हा त्याला त्रास होतो तरीपण त्यामुळेच तो प्रवासी चालणे शिकतो. अशा या प्रवासात द्वारकादास चिखलीकरांनी आपले जीवन चालवले आहे. ज्याला प्रेम कळते त्याला चिखलीकर समजून घेण्याची गरज नाही. कारण त्यांना माहित आहे की, जे आम्ही दुसऱ्याला देवू तेच आम्हाला परत मिळेल म्हणून त्यांनी नेहमी इतरांना सन्मानच दिला आणि त्याच्या बदल्यात त्यांना नेहमी सन्मानच मिळाला. आपल्या जीवनात आलेल्या घाणेरड्या लोकांची ओळख त्यांना खुप लवकर होते. कारण त्यांना माहित आहे की, घाणेरड्यांना आम्ही जेवढी जास्त किंमत देवू तेवढा मोठा जास्त धोका ते देणार आहेत. म्हणून त्यांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी दक्षता बाळगली आणि त्या दक्षतेतून त्यांनी आपले जीवन चालवले.


कोणाचे भले करतांना आपल्याला काही अपेक्षा नसाव्यात हे जर शोधायचे असेल तर द्वारकादास चिखलीकरांना पाहावे. कारण त्यांनी नेहमी फुले वाटलेली आहेत आणि म्हणून त्यांच्या हातांवर नेहमी सुगंध दरवळत राहतो. अनेक जण चिखीकरांना वाईट म्हणतात सुध्दा पण बोलणाऱ्यांनी कधी स्वत: चा विचार केला नाही की आम्ही काय गंगास्नान करून आलो आहोत. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तिच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. काम करतांना अशा गोष्टींमध्ये यशस्वी होण्याची खात्री नक्कीच नसेल परंतू संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच मिळते अशी तयारी चिखलीकरांची नेहमीच असते आणि ते संघर्षासह प्रवास करतांना त्यांच्यातील प्रेरणा इतरांना सुध्दा ताकत देते. यापुढे मात्र आता पोलीस सेवा काळाचा जवळपास एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक आहे. या काळात चिखलीकरांनी हे लक्षात ठेवायला हवे की, शब्द शोधला तर अर्थ आहे, शब्द वाढला तर कलह आहे, शब्द सोसला तर सांत्वन आहे, शब्द झेलला तर आज्ञा आहे, शब्द टाकला तर वजनदार आहे, शब्द अक्षरांची माळ आहे, शब्द अक्षयपण आहे आणि शब्द नि:शब्द पण आहे. हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्द असतात जादुगर ज्यांनी माणसे जोडली जातात. आमच्या या शब्दांना चिखलीकरांनी आपल्या पुढील सेवा काळात उपयोगात आणावे अशी आमची अपेक्षा आहे.
भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. त्या ज्यांना असतात त्यांनाच कळतात. आपल्या जीवनात आपण पाहिलेल्या वेदना आणि आपण व्यक्त केलेल्या भावना या ज्यांनी पाहिल्या त्यांनी त्याप्रमाणे तुमचे आकलन केले आहे. तरीपण आपण आपल्याकडून काय देता येईल यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत आणि त्या प्रयत्नातून तुमचे यश तुमच्यासमोर आहे. तुमचे दोन्ही बालक सक्षम झाले आहेत. एक मुलगी ज्यांचा विवाह झाला आहे आणि एक मुलगा जो आता पोलीस उपनिरिक्षक पदावर प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे पोलीस दलाचा वारसा सुध्दा तुमच्या कुटूंबात आलेला आहे. खुप पैसा, गाडी, बंगले, दाग-दागिणे आहेत म्हणजे तो माणुस श्रीमंत असतो असे मुळच नसते. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणुसच खरा सर्वात श्रीमंत असतो. पैसा गाडी, बंगले हे क्षणीक भौतिक सुख आहे तेंव्हा यापुढे आता याचा विचार न करता आपल्याला आपल्या जीवनात जमवलेल्या ज्ञानातील वाटणी जास्तीत जास्त कशी करता येईल याच्यावर आपण विचार करा.

परिस्थितीमुळे स्वभाव बदल होतो. पण माणुस कालही तोच होता, आजही तोच आहे आणि पुढेही तोच राहणार आहे याची जाणीव ठेवून यावर जोरदारा विचार करा आणि आपल्या परिस्थितीनुसार आपण बदललात तरी आपल्या आसपास वावरणाऱ्या लोकांबद्दल दक्षच राहा. तरच पुढचे जीवन यशस्वीपणे पार पाडता येईल. चर्चा, संवाद, तडजोड, माघार या चार प्रमुख गोष्टींचा जीवनातील प्रवाहात यथोचित वापर करण्याची बुध्दी आपल्यामध्ये आहेच कोणताही निर्णय एकतर्फी घेवू नका आणि कधी काळी तुम्हाला माघार घ्यावी लागली तरी ती माघार अपमान वाटून घेवू नका. एखाद्या कामात अपयश आले तरी आपल्या नात्यांना अतुट ठेवा. ज्यांचा विनियोग आपल्याला पुढच्या जीवनात कधी तरी होवू शकतो. ज्याप्रमाणे काट्यात जावून गुलाब फुलतो अशाच त्रासांमध्ये खरा माणुस जगमगतो अशी आपली ख्याती आहे आणि आपण पुढे सुध्दा असेच कायम राहा अशी आमची अपेक्षा आहे. जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुमचा चांगलेपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धुर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो. पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ त्या धुरात नसते म्हणून आपल्याकडे तिरस्काराने पाहणाऱ्या लोकांमुळे आपल्या जीवनात काही फरक पडणार नाही याची जाणिव आपल्या मनात साठवून ठेवा. कारण जो इतरांना बोचतो तोच माणुस प्रसिध्द होतो. आपल्या स्वत:च्या पाय्यावर उभे राहण्याची किमया काही गुन्हेगारी नसते. ती तुमची कला आहे आणि त्या कलेतून तुम्ही निर्माण केलेले हे इंद्रधनुषी जीवन आपले पुढील आयुष्य लोकांसाठी एक आदर्श ठरेल. तुम्ही आपल्या जीवनात सर्वच दाव जिंकले आहेत. कारण आपण शक्तीपेक्षा बुध्दीचा वापर जास्त केलेला आहे. शक्ती फक्त लढणे शिकवते पण बुध्दी मात्र जिंकायला शिकवते.


आम्ही आपल्याला पाहिले तेंव्हा आपण सिंहा सारखे दिसलात सिंह ज्या ठिकाणी बसतो तेथेच सिंहासन तयार होते. त्याला कोठे सिंहासनाची चिंता नसते असेच आपण आपल्या जीवनात वागलात. आपण आपल्या हिंमतीचा आणि किंमतीचा अंदाज कोणाला सापडू दिला नाहीत हे आपल्या यशा मागचे गमक आहे आणि लोक याच दोन गोष्टी शोधतात. आपण हरण्याची पर्वा कधीच केलेली नाही, जिंकण्याचा मोह सुध्दा कधी केलेले नाही, प्रयत्न करणे सोडलेले नाही कारण हरलेल्या वस्तु सापडू शकतात पण एकच वस्तु अशी आहे जी कोणत्याही उपायाने पुन्हा मिळू शकत नाही ते म्हणजे आपले आयुष्य तेंव्हा मनसोक्त जगा या शब्दांसह आपणास जन्मदिनाच्या शुभकामना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *