नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या तीस वर्षापासून पत्रकारीता करत असतांना रामप्रसाद खंडेलवाल यांना ऍट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले. 13 ऑगस्ट रोजी तयार केलेल्या एका ब्लॉगवरून तथाकथीत पत्रकार या नावासह बातमी सुध्दा प्रसिध्द करण्यात आली. ज्यांनी हा ब्लॉग सुरू केला. ते कोणते पत्रकार आहेत. कायद्याच्या प्रक्रियेतून जाण्याची तयारी आहेच. ती पुर्ण झाल्यानंतर काय होईल? ज्या व्यक्तीने आम्हाला माहिती दिली आहे त्याचे नाव उघड करून आम्ही उत्कृष्ट पत्रकारीतेच्या कामाला काळीमा फासू इच्छीत नाही. तंत्रज्ञान कायदा एफआयआरमध्ये नसतांना बातमीत लिहिला गेला अशी ही पत्रकारीता कोणती खरी हे वाचकांनी ठरवावे.
दि.13 ऑगस्ट रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल बळीरामपुर येथील एका शिक्षकाने रामप्रसाद खंडेलवाल यांना दुरध्वनी वरुन दिलेल्या माहितीच्या आधारे परमेश्र्वर गोणारे हे शिक्षण विस्तार अधिकारी काय करतात.अशी बातमी वास्तव न्युज लाईव्हने प्रसारीत केली. 13 वर्षापुर्वी रामप्रसाद खंडेलवाल यांनी फेसबुक अकाऊंट काढले आहे आणि तेंव्हापासून त्यांनी लिहिलेल्या सर्वच बातम्या फेसबुक अकाऊंटवर प्रसारीत केल्या जातात. दि.13 ऑगस्टच्या बातमीला सुध्दा त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर अनेक चांगल्या कॉमेंटस् आहेत, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कार्यवाही झाली पाहिजे असे एका वाचकाने लिहिले आहे.
13 ऑगस्ट रोजी ज्या व्यक्तीने रामप्रसाद खंडेलवाल यांना माहिती दिली तो ऑडीओ आम्ही सार्वजनिक केला तर त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाबद्दल रामप्रसाद खंडेलवाल यांनी काय म्हटले आहे हे ऐकल्यावर वाचक थक्क होतील. पण माहितगाराचे नाव सार्वजनिक करून आम्ही आमच्या पत्रकारीतेला काळीमा फासू इच्छीत नाही. 15 ऑगस्ट रोजी रात्री 20.23 वाजता नांदेड ग्रामीणचे अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या आदेशाने रामप्रसद खंडेलवाल विरुध्द गुन्हा क्रमांक 498/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 500 आणि 501 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(1)(पी), 3(1)(क्यु) आणि 3 (1)(यु) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोेरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
परमेश्र्वर गोणारे हे हिमायतनगर तालुक्यातील राहणारे आहेत. त्यांनी आपल्या नोकरीच्या काळात काय-काय डोंगर उभारले आहेत याची जाणीव आमच्या पेक्षा जास्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना आहे. रामप्रसाद खंडेलवाल विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत. कायद्याची प्रक्रिया पुर्ण होईलच. गुन्हा दाखल झाला म्हणून बातम्या लिहायच्या नाहीत असे होणार नाही. आम्ही सत्यासाठीच हे काम मागील 30 वर्षापासून सुरू केलेले आहे आणि ते पुढेही सुरू राहणारे आहे असे रामप्रसाद खंडेलवाल यांनी सांगितले. काही दिवसांपुर्वीच परमेश्र्वर गोणारेने दिलेल्या माहितीच्या आधारावर सुध्दा रामप्रसाद खंडेलवाल यांनी बातम्या लिहिल्या आहेत. तक्रारदार गणेश भुजंगराव ढवळे आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे ते मुख्याध्यापक आहेत. रामप्रसाद खंडेलवाल यांच्या बद्दल त्यांना काय ओळख आहे. फिर्यादीमध्ये ते अनुसूचित जातीचे असल्यामुळेच अशा बातम्या प्रसारीत केल्याचे लिहिले आहे. हा अर्ज घेवून जातांना त्या ठिकाणी परमेश्र्वर गोणारे, मनिष कावळे ही मंडळी सुध्दा उपस्थित होती. मग एखाद्या व्यक्तीचा गुन्हा दाखल करण्यासाठी सोबत दोन ते चार लोक जावे लागतात काय असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. मनिष कावळे यांनी 13 ऑगस्ट रोजी तयार केलेल्या ब्लॉगवर तथाकथीत असा शब्द वापरला आहे आणि फिर्यादीमध्ये रामप्रसाद खंडेलवाल पत्रकार आहेत असे लिहिलेले आहे.
माहिती देणाराच कटात सहभागी असेल तर ?
रामप्रसाद खंडेलवाल यांना १३ ऑगस्ट रोजी आपल्यावर आणि शिक्षकांवर होणाऱ्या अत्याचाराची माहिती देणाराच त्याच्या विरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला लावण्यात सहभागी असेल तर हा प्रश्न सुद्धा आता महत्वाचा आहे.पत्रकारांनी आपल्याकडे येणारी माहिती आणि त्यावरील विश्वास या बाबत आता गंभीर विचार करण्याची गरज आहे. तसेच त्या कटात कोण कोण सामील आहेत त्याचा शोध सुद्धा घेण्याची गरज रामप्रसाद खंडेलवाल यांना आहे.एफआयआर मध्ये ब्लॅक मेलिंग लिहिलेले आहे.कधी आणि कोणाची केली ब्लॅक मेलिंग या बाबत काही एक उल्लेख एफआयआर मध्ये मात्र केलेला नाही.
संबंधीत बातमी…..
https://vastavnewslive.com/2022/08/13/शिक्षणविस्तार-अधिकारी-पर/