बारड शिवारातील खुनाचे आरोपी स्था.गु.शा.ने पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-बारड शिवारात दि. १४ ऑगस्ट रोजी सुशिल त्र्यबंकराव श्रीमंगले याचा अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणासाठी खुन केला होता. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या सुचनेवरुन या गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध सुरू झाला.

दि. १७ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुशिल श्रीमंगलेचा खून हा मयताची आई शोभा त्र्यंबकराव श्रीमंगले यांनी इतर दोन युवकांना सोबत घेवुन केला आहे. या महितीवरुन त्यांनी त्वरीत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांना रवाना करून या गुन्हयातील संशयीत महीला शोभा त्र्यबंकराव श्रीमंगले (वय ५५) रा. गितानगर नांदेड हिला ताब्यात घेण्यास सांगितले. शोभा श्रीमंगलेला ताब्यात घेवून गुन्ह्यासंबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी या गुन्ह्यातील त्यांचा मयत मुलगा सुशिल हा नेहमी तिला व तिच्या पतीला मारहाण करुन त्रास देत असल्याकारणाने तिच्या घरी भाड्याने राहणारे राजेश गौतम पाटील व त्याचा मित्र विशाल देवराव भगत यांना सुशिल याचा खुन करण्यास सांगितले.त्यावरुन स्थागुशाचे पथकाने राजेश गौतम पाटील (वय २७) रा. गितानगर, नांदेड व विशाल देवराव भगत (वय २७) रा. महेबुबनगर, नांदेड यांना ताब्यात घेवुन विचारणा केली असता सुशीलचा खून त्यांनी शोभा श्रीमंगले यांचे सांगण्यावरुन केल्याचे सांगितले. या तिन्ही आरोपींना पुढील तपाससाठी बारड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक व्दारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडुरंग माने, शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार मारोती तेलंग, गुंडेराव कर्ले, विठल शेळके, देवा चव्हाण, मोतीराम पवार, शंकर म्हैसनवाड, हनुमानसिंग ठाकुर, शेख कलीम, महिला पोलीस अंमलदार महेजबीन शेख यांनी केल्या कामगिरीचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *