भोकर (प्रतिनिधी)-तहसीलदार भोकर यांना आज दि.18 ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल हे पत्रकारिता क्षेत्रात मागिल 25 वर्षापासून कार्यरत असून आजपर्यंत त्यांनी अनेक नागरिक व कर्मचारी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली लेखनी झीजवली आहे. पण परवा-त्यांनी एका शौक्षणिक क्षेत्रात चालत असलेला अनागोंदी कारभार उघड करताच पित्त खवळलेल्या एकाने त्यांच्या विरोधात नांदेड ग्रामिण पोलीस स्टेशनला खोटी ऑट्रॉसिटी दाखल करून लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभास बदनाम करन्याचा व आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हणून भविष्यात जर पत्रकारावर अश्या खोट्या तक्रारी दाखल होत असतील तर आता पत्रकार गप्प बसणार नाहीत, म्हणून आपणास विनंती की, पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर दाखल झालेली खोटी ॲट्रॉसिटी तात्काळ मागे घेऊन सहकार्य करावे या आशयाचे निवेदन देण्यात आले असून निवेदनावर पत्रकार रमेश गंगासागरे, पत्रकार राजेश चंद्रकर, पत्रकार संदीप गंगासागरे, पत्रकार सुनील पाटील लामकाणीकर, विजय मोरे, सतिष भवरे, हमीद पठाण, आणि शुधानशु कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.