नांदेड (प्रतिनिधी)-कंधार येथे देव दर्शनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील भाविकांचा शहरालगतच्या नवरंगपुरा शिवारातील तलावात बुडून दोन युवक तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झालेल्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
राज्यासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच धरणे तलाव जलाशय हे देखील फुल्ल भरले आहेत. कंधार शहरातील तलावात देवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबातील सदस्य नवरंगपुरा येथील तलावाच्या बाजूस जेवण करीत असताना हात धुण्यासाठी गेलेल्या मुलगा पाण्यात पडला असता त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील दोन युवक तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. १)मोहम्मद विखार अब्दुल गफार वय ३० वर्षे, २)मोहम्मद साद शफीयोद्दीन वय १५ वर्ष, ३)सय्यद सोहेल सय्यद वहीद, ४)मोहम्मद शफीयोद्दीन मोहम्मद गफार,५) सय्यद नावीद सय्यद वहीद रा. गणीपुरा दिवानी बावडी मलिया नांदेड हे आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि शिवाय धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.