भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले विरुध्द ऍट्रासीटीची कार्यवाही करा-वास्तव न्युज लाईव्हची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल हे कुप्रसिध्द चॅनेल माफिया(माफिया हा शब्द पुर्ण लिहिता आलेला नाही.) तसेच कांही गुंडप्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरुन वास्वत न्युज लावाचे (नावाचे) बेव पोर्टल काढले आहे असा अर्ज विशेष पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड यांच्या नावे लिहिला. यामध्ये वास्तव न्युज वेब पोर्टलचे नाव आल्यामुळे वास्तव न्युज लाईव्हचे संपादक कंथक सुर्यतळ यांनी माझी बेअब्रु जातीय द्वेष भावनेतून प्रविण साले यांनी केला आहे, अशी तक्रार आज पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे दिली आहे. आता पाहुया काय होणार?
वास्तव न्युज लाईव्हचे नाव वापरुन रामप्रसाद खंडेलवाल या पत्रकाराने माझ्यावर शासकीय लोकांनी कार्यवाही करावी या हेतुने बातमी प्रसिध्द केली असा अर्ज गणेश ढवळे यांनी दिल्यानंतर रामप्रसाद खंडेलवाल यांच्याविरुध्द ऍट्रॉसिटी कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा 15 ऑगस्ट रोजी दाखल झाला.
त्यानंतर भोकर येथील पत्रकार संघाने खोटा गुन्हा दाखल झाला आहे तो रद्द करावा अशी मागणी करणारे निवेदन प्रशासनाला दिले. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी महानगर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रविण साले यांनी आपल्या लेटर पॅडवर एक अर्ज लिहिला त्यात विशेष पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड, नांदेड परिक्षेत्र नांदेड असे संबोधन केलेले आहे. प्रविण साले यांना कार्यालय सुध्दा माहित नाही. या अर्जात रामप्रसाद खंडेलवाल बद्दल लिहितांना मराठी भाषेची वाट लावलेली आहे. तसेच कांही लोकांना धरुन पैसे वसुलीचे काम करतो असे लिहिले आहे. त्यांना याचीही माहिती नाही वास्तव न्युज लाईव्ह वेब पोर्टला शासनाची परवानगी आहे की नाही. हे सर्व लिहित असतांना जिल्ह्यातील पिस्टल माफिया, भुमाफिया यांच्यावर केलेली कठोर कार्यवाही बोगस वेब चॅनल माफियावर करावी आणि त्याला जिल्ह्यातून हद्दपार करावे असा मजकुर लिहिला आहे. हा अर्ज नियंत्रण कक्ष अधिकारी पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालय नांदेड, परिक्षेत्र नांदेड यांना देवून त्यांच्याकडून त्याची पावती घेवून ती पावती अनेक व्हाटसऍप संकेतस्थळांवर व्हायरल केली. या संदर्भाने काही वर्तमानपत्रांनी सुध्दा प्रविण साले सारख्या अत्यंत निर्भीड व्यक्तीच्या बातम्यांना आपल्या वर्तमानपत्रात जागा देवून प्रसिध्दी दिली.
रामप्रसाद खंडेलवाल यांच्याबद्दल काय आकस असेल त्या संदर्भाने प्रविण साले यांनी काहीही करायला हरकत नव्हती. पण त्यात वास्तव न्युज लाईव्ह या वेब पोर्टलचे नाव टाकून त्यांनी जातीय भावनेतून न्युज पोर्टलची बदनामी होईल या उद्देशाने आणि न्युज पोर्टलचे संपादक अनुसूचित जातीचे असल्याचे माहित असतांना त्या व्यक्तीची बदनामी केली आहे. वास्तव न्युज लाईव्हचे संपादक यांनी आपल्या अर्जात रामप्रसाद खंडेलवाल यांचा व्यक्तीगतरित्या वास्तव न्युज लाईव्हशी काही संबंध नाही त्याचे सर्वस्व अधिकार माझ्याकडेच आहेत असे आपल्या अर्जात लिहिले आहे. तसेच जातीय द्वेष भावना ठेवून केलेल्या बदनामीसाठी प्रविण सालेविरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी असा अर्ज वास्तव न्युज लाईव्हचे संपादक कंथक सुर्यतळ यांनी आज पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे शिवाजीनगर नांदेड यांना दिला आहे. या अर्जात मी अनुसूचित जाती आहे हे माहित असतांना माझी व माझ्या वेब पोर्टलची बदनामी केली आहे. पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्यावतीने माझ्याविरुध्द कांही तरी कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या दुष्ट हेतूनेच, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी हा अर्ज दिलेला आहे अशा आशयाचा मजकुर कंथक सुर्यतळ यांनी आपल्या अर्जात लिहिला आहे. या अर्जासोबत कंथक सुर्यतळ यांनी प्रसारमाध्यमांनी प्रसारीत केलेल्या बातम्यांची कात्रणे जोडली आहेत. तसेच प्रविण साले यांचा अर्ज सुध्दा जोडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *