ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्या विरोधातील खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा मागे घ्या; देगलूर पत्रकार संघाची मागणी

 

देगलुर (प्रतिनिधी)-ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्या विरोधात खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे ते मागे घ्यावे अशा आशयाच्या मागणीचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी सौ.शर्मा मॅडम यांना देगलूर पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम वद्येवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे.

नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल हे पत्रकारिता क्षेत्रात मागील 25 वर्षांपासून कार्यरत असून आजपर्यंत त्यांनी अनेक नागरिक व कर्मचारी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली लेखणी चालवून न्याय मिळवून दिला आहे. पण नुकताच त्यांनी एका शैक्षणिक क्षेत्रात चालत असलेला अनागोंदी कारभार उघड करतातच पित्त खवळलेल्या एकाने त्यांच्या विरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात खोटी ॲट्रॉसिटी दाखल करून लोकशाहीच्या आधारस्तंभ बदनाम करण्याचा करंडेपणा केला आहे. तथापि पत्रकारावर अशा खोट्या तक्रारी दाखल करून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्या विरोधातील दाखल झालेला खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा मागे घ्यावे अशा मागणीचे निवेदन देगलूर पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम वद्येवार यांच्यासह सर्व पत्रकारांनी सहाय्यक जिल्हाधिकारी सौ. शर्मा मॅडम यांना निवेदन सादर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *