स्थागुशाचे पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडेंची उत्कृष्ट कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-25 ऑगस्टच्या रात्री स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पोलीस ठाणे इतवाराच्या हद्दीत झालेला एक चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.
दि.25 ऑगस्ट रोजी दैनंदिन काम करतांना पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे यांची रात्रीची गस्त होती. त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार कदम, रुपेश दासरवाड आणि हनुमानसिंह ठाकूर ही मंडळी होती. रात्रीची गस्त करत असतांना ते मध्यरात्रीच्या आसपास शहरातील ओम गार्डनसमोर आले असतांना त्यांना त्यांच्या माहितीगाराने दिलेल्या खबरीनुसार त्यांनी दत्ता नरहरी मुतकलवाड (30) रा.शंकतीर्थ ता.मुदखेड या व्यक्तीला विचारपुस केली. त्याच्याकडे एक मोबाईल होता. त्या मोबाईल संदर्भाची माहिती घेतली असता तो मोबाईल त्याने रेल्वे स्थानक परिसरातून एका युवकाकडून खरेदी केल्याचे सांगितले. या संदर्भाची माहिती सायबर विभागाकडून घेतली असतांना हा मोबाईल चोरीचा असल्याचे लक्षात आले. तेंव्हा पंचासमक्ष तो 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल स्थानिक गुन्हा शाखेने जप्त केला. या मोबाईल चोरीचा गुन्हा क्रमांक 206/2022 हा इतवारा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेला आहे. त्यामुळे पकडलेला आरोपी मुतकलवाड आणि चोरीचा मोबाईल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी इतवारा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आदींनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *