
नांदेड(प्रतिनिधी)-खंडणीची मागणी करून धनादेशाचा उपयोग खंडणीसाठी करणाऱ्या पवन जगदीश बोराला अटक करून पोलीस कोठडीत टाकल्यानंतर लगेच त्याला घेरी आली. सध्या शासकीय इतमामात पवन जगदीश बोरावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
काल दि.29 ऑगस्ट रोजी अभिजित अशोक सोमय्या यांच्या तक्रारीवरुन पवन जगदीश बोराविरुध्द सायंकाळी भारतीय दंड संहितेच्या कलम 386 आणि 379 नुसार गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच वजिराबाद पोलीसांनी पवन जगदीश बोराला अटक करून पोलीस कोठडीची हवा दाखवली. या पुर्वी सुध्दा अनेकदा पोलीस कोठडीची हवा पाहिलेल्या पवन जगदीश बोराला मात्र काल घेरी आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रात्रीतूनच त्याची रवानगी शासकीय रुग्णालयात झाली आहे. काल सायंकाळी गुन्हा दाखल झाला. त्याच्या 15 मिनिटा अगोदर पवन जगदीश बोरा हा अत्यंत ऐटीत दुचाकीवर वजिराबाद भागातून फिरत होता. ते अनेक सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेले आहे. पण पोलीस कोठडीची हवा अनुभवताच त्याला घेरी आली अशी खात्रीलायक माहिती आहे. अचानकच घेरी कशी येते हा एक मोठा प्रश्न समोर आला आहे.
मागच्या वेळेस अटक झाली होती तेंव्हा सुध्दा इंग्रजीमध्ये बोलण्याचे त्यांचे किस्से प्रसिध्द आहेत. ते सुध्दा वजिराबाद पोलीस ठाण्यातच घडले होते. आज त्याला आलेल्या शारिरीक समस्येचा उपचार सुध्दा पोलीस योग्यरितीने करतीलच अशी अपेक्षा आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2022/08/30/खंडणीचे-अनेक-गुन्हे-दाखल/