नांदेड(प्रतिनिधी)-29 ऑगस्टच्या रात्री 10 वाजता नशेत झालेल्या भांडणाच्या परिस्थितीत एका युवकाने दुसऱ्या युवकाच्या मांडीत खंजीर खुपसला. जखमी उपचार घेत आहे आणि हल्लेखोरांपैकी एक शिवाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.
नवी आबादी परिसरात काल रात्री जिवन उत्तम शंखपाळ आणि त्याच्यासह इतर तीन जण त्या भागातील एका पान टपरीवर गेले होते. तेथे झालेल्या वादावादीच्या वेळेस शेख रईस शेख फारुख (26) या युवकाने भांडणात हस्तक्षेप करून त्या भांडणाला संपविण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळी जीवन उत्तम शंखपाळ आणि इतर तिघांनी शेख रईसला अरेरावी करून त्याच्या मांडीत खंजीर खुपसला.
घटना घडताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक आणि अनेक पोलीस अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी पोहचले. सध्या शेख रईसवर उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱ्या चार जणांपैकी जीवन शंखपाळला शिवाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आज दि.30 ऑगस्टची माहिती घेतली असता पोलीसांनी शेख रईसकडून माहिती घेतली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती.
नई आबादी परिसरात राडा