नांदेड(प्रतिनिधी)-उद्या भाद्रपद शुक्ल चतुर्थी अर्थात श्री गणेशाची स्थापना. नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या या श्री गणेश सोहळ्यासाठी पोलीस विभागाने भरपूर तयारी केली आहे.
उद्यापासून सुरू होणाऱ्या श्री गणेश उत्सवासाठी पोलीस अधिक्षक -1, अपर पोलीस अधिक्षक-2, उपविभागीय पोलीस अधिकारी-9, पोलीस निरिक्षक-29, सहाय्यक पोलीस निरिक्षक/पोलीस उपनिरिक्षक-205, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक /पोलीस अंमलदार/पोलीस शिपाई/ महिला पोलीस अंमलदार-1195, आरसीपी प्लॅटून-5, पोलीस उपअधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई-2, लातूर आणि जालना येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक-10, विद्यार्थी पोलीस उपनिरिक्षक नाशीक-25, लातूर आणि जालना येथील पोलीस प्रशिक्षणार्थी पुरूष-150, महिला-50, गृह रक्षक दलाचे जवान-1 हजार, महिला गृहरक्षक-200 असे मनुष्यबळ श्री गणेश सोहळा शांततेत व आनंदात पार पडावा यासाठी कार्यरत करण्यात आला आहे.
श्री गणेश सोहळ्यासाठी पोलीस दल सज्ज