नांदेड,(प्रतिनिधी)- आज दारू विक्री प्रतिबंधित असतांना एक विधी संघर्षग्रस्त बालक देशी दारू विक्री करतांना शिवाजीनगर पोलिसांनी पकडला आहे.त्याच्या कडून १६ देशी दारूच्या ११२० रुपयांच्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार शेख इब्राहिम आणि त्यांचे सहकारी शेख अझहर हे आज गणपती महोत्सव शांततेत व्हावा यासाठी गस्त करीत असतांना त्याना वाय पॉईंट जवळ देशी दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.तेव्हा दोन्ही पोलीस अंमलदार तेथे पोहचले आणि त्यांनी एक अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालक सापडला.त्याच्याकडे करीबॅगमध्ये १६ देशी दारूच्या १८० एमएलच्या ११२० रुपये किमतीच्या बाटल्या सापडल्या.याबाबत शेख इब्राहिम यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस अंमलदार घुगे करणार आहेत.
आता चुकीची कामे करणाऱ्यांना सुद्धा कायदा समजत आहे,त्याचेच हे सुंदर उदाहरण आहे.विधी संघर्षग्रस्त बालकांच्या वयातील बालकांकडून अशी गैरकायदेशीर कामे करून घेतली जात आहेत.समाजाने अश्या परिस्थितीत स्वतःच काहीतरी विचार करण्याची गरज आहे.