नांदेड,(प्रतिनिधी)-दि.31 ऑगस्ट रोजी आपला सेवा कार्यकाळ पूर्ण करून सेवा निवृत्त झालेल्या तीन पोलीस उप निरीक्षक आणि तीन पोलीस अंमलदार अश्या सहा जणांना अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी सह कुटुंब सन्मानित आज दि.1 सप्टेंबर 2022 रोजी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या उपस्थितीत त्यांना सहकुटूंब सन्मान करून निरोप देण्यात आला.
पोलीस सेवा काळातील आपली नियोजित सेवा आपल्या वयाप्रमाणे पूर्ण करून नांदेड जिल्हा पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक बालाजी टोपाजी कोकरे (पोलीस ठाणे अर्धापूर),नारायण गणपत कदम (पोलीस ठाणे लोहा),प्रकाश सुरतराम चौहाण (पोलीस ठाणे इतवारा),पोलीस हवालदार शिवाजी गोविंदराव देशपांडे आणि शिवाजी प्रभात शिंदे (पोलीस मुख्यालय),पोलीस नाईक श्रामराव नामदेव मुसळे (पोलीस मुख्यालय) अश्या सहा जणांनी आपली सेवा 31 ऑगस्ट रोजी पूर्ण केली.
आज 1 सप्टेंबर 2022 रोजी अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,गृह पोलीस उप अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांनी सेवा निवृत्त सर्व सहा पोलिसांचा सन्मान करून त्यांच्या सेवेची प्रशंसा केली.याप्रसंगी पोलीस कल्याण विभागाचे पोईस निरीक्षक अनिल चोरमले,सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी लष्करे,कमल शिंदे,यांच्या सह सर्व पोलीस विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहायक पोलीस उप निरीक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले.पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट केले.
तीन पोलीस उपनिरिक्षक आणि तीन पोलीस अंमलदारांना सेवानिवृत्तीनंतर सहकुटूंब सन्मान