24 तासाचे आत केले अटक
नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील ढवळे कॉर्नर येथील प्रदिप वाईन शॉपमध्ये दिनांक 01् सप्टेंबर 2022 रोजी रात्री 08.30 वाजता एक इसमाने येऊन काउंटरवर जाऊन एक टु वर्ग विअरची मागणी केली. त्या कंपनीची बिअर उपलब्ध नसल्याचे वाईन शॉपचे मैनेजर यांनी सांगीतले असता, त्या साई इंगळे नावाच्या इसमाने माझा ब्रॅन्ड कसा काय नाही. असे म्हणुन, शिवीगाळ करुन, साई इंगळे काय चिज आहे, थांब तुला दाखवतो असी धमकी देऊन निघुन गेला थोडयावेळाने त्याचे 4-5 साथीदारासह हातात लाकडी बॅट, खंजर घेऊन दुकानात परत येऊन, त्या साई इंगळे याने म्हणाला की, पम्याभाई आज इनको जिंदा नही छोड़ना असे म्हणुन, फिर्यादी, मयत व साक्षीदारांना दुकानाचे बाहेर बोलावले, ते बाहेर येत नसल्याने, त्यांनी दुकानाची लोखंडी गेटची जबरीने कडी काढुन आत घुसुन मॅनेजर माधव जिवनराव वाखोरे यास व फिर्यादीस बाहेर ओढुन लाकडी बॅट, लाथा बुक्याने मारहाण करु लागले, त्यापैकी एकाने मॅनेजर यास, तेरकु आज जिंदा नही छोडुंगा असे म्हणुन त्यास जबरीने ओढुन दुकानाचे बाहेर नेऊन खंजरने मारहाण केली, तो रक्तबंबाळ होऊन खालील पडला, त्यानंतर ते अँटोत बसुन पळुन गेले असल्याची तक्रार साईनाथ जळबाजी गुडमलवार रा. गुरुवार बाजार, सिडको, नांदेड यांने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे, नांदेड ग्रामीण, गु.र.नं. 536/2022 कलम 302,307,452,294, 143, 147, 148, 149, 323, 504,506 भा.दं.वि. सह 4 / 25 27135 भा.ह. का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिले.
त्यावरुन सदर गंभीर गुन्हयाचे घटनास्थळी तात्काळ प्रमोद शेवाळे पोलीस अधीक्षक, नांदेड, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, स्था. गु.शा. चे पोनि द्वारकादास चिखलीकर हे त्यांचे अधिपत्याखालील पोलीस पथकासह भेट दिली. सदर गुन्हयाचे घटनास्थळी दिनांक 01 सप्टेबर 2022 रोजी गुन्हा घडल्यानंतर तात्काळ भेट देऊन, घटनास्थळी व घटनास्थळावरुन आरोपी पळून गेलेल्या मार्गावरील उपलब्द असलेल्या सी. सी.टि.व्ही फुटेज मध्ये कैद झालेल्या आरोपीची माहिती घेऊन, त्यांची ओळख पाटवून त्यांचे नाव व पत्ता निष्पन्न केले असता, आरोपी साईनाथ इंगळे, पम्या ऊर्फ प्रेमसिंघ सपुरे व इतर असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व आरोपीचा शोध घेण्यासाठी त्या त्या भागात गुप्त बातमीदार नेमण पोलीस पथक रवाना केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. स्वतः सपोनि पांडुरंग माने व शिवसांब घेवारे सपोनि यांचे पोलीस पथकाने या गंभीर गुन्हयातील आरोपींचा पाठपुरावा केला, सदर आरोपी हे मौजे सांगवी बु भागात एका ठिकाणी लपुन बसल्याची गोपनिय माहिती मिळाली होती, त्यावरुन सदर पोलीस पथकाने त्या भागात शोध घेतला असता, आरोपी हे असना नदीच्या चौकात थांबल्याची माहिती मिळाली. त्या आरोपींची माहिती काढीत सदर पथक हे असना नदीचे चौकात पोहचले असता, आरोपी हे पोलीसांना पाहुन अर्धापुरकडे जाणाऱ्या रोडने पळ काढले, तेंव्हा पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन तीन इसमांना पकडुन त्यांचे नांव गांव विचारले असता, त्यांनी त्यांचे नांव (1) साईनाथ सुभाषराव इंगळे वय 28 वर्षे व्यवसाय अॅटो चालक रा. दत्तनगर, नांदेड, व त्याचा भाऊ (2) उमेश सुभाषराव इंगळे वय 35 वर्षे व्यवसाय मजुरी रा. दत्तनगर, नांदेड, व (3) बालाजी मारोतराव कुरुडे वय 37 वर्ष व्यवसाय अँटो चालक रा. दत्तनगर, नांदेड असे सांगीतले. त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, त्यांनी व त्यांचे फरार इतर साथीदारांनी मीळुन बिअर मागण्याच्या कारणावरुन गुन्हा केल्याचे सांगीतले. त्या तीन्ही आरोपींना आज दिनांक 02/09/2022 रोजी 15.00 वाजता ताब्यात घेऊन पुढील तपास कामी पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,प्रमोद शेवाळे, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व निलेश मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. द्वारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग माने, सपोनि शिवासांब घेवारे, पोउपनि अशिष बोराटे, गोविंदराव मुंढे, सपोउपनि सलीम बेग, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, पद्मा कांबळे, मोतीराम पवार, विठल शेळके, रुपेश दासरवाड, महेश बडगु, राजु सिटीकर, शेख कलीम, हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे प्रमोद शेवाळे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतूक केले आहे