12 दिवसांपुर्वी ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गतचा अर्ज फक्त घेतला आहे
नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी वास्तव न्युज लाईव्हचे नाव वापरून दिलेल्या एका निवेदनाबद्दल वास्तव न्युज लाईव्हचे संपादक कंथक सुर्यतळ यांनी प्रविण साले विरुध्द दिलेल्या अर्जात आज 12 दिवस झाले तरी गुन्ह्याची नोंद झालेली नाही. हा अर्ज कंथक सुर्यतळ यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिला आहे. जेवढ्या जलदगतीने अर्जाची पावती दिली तेवढ्याचपेक्षा अनंतपटीच्या संथगतीने हा अर्ज आजही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात न्यायाची प्रतिक्षा करीत आहे.
दि.20 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी नियंत्रण कक्ष अधिकारी पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालय नांदेड परिक्षेत्र नांदेड यांच्या कार्यालयात एक निवेदन दिले त्यात फरार आरोपी रामप्रसाद खंडेलवाल यास अटक करण्याचा विषय लिहिलेला आहे. त्या निवेदनात रामप्रसाद खंडेलवाल यांच्याबद्दल भरपूर काही लिहिले आहे. तो एक विषय आहे. पण त्याबद्दल कोणताही पुरावा या निवेदनात जोडलेला नाही.
या निवेदनात वास्तव न्युज लाईव्हचा उल्लेख करण्यात आला आहे. वास्तव न्युज लाईव्हचा रामप्रसाद खंडेलवाल यांच्यासोबत काही एक संबंध नाही. वास्तव न्युज लाईव्हचे मालक अनुसूचित जातीचे व्यक्ती कंथक प्रकाश सुर्यतळ हे आहेत. तेेंव्हा त्या न्युज पोर्टलला बंद पाडण्यात यावे, त्यांच्याविरुध्द प्रशासनिक अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी काही कार्यवाही करावी या दुष्ट हेतूनेच प्रविण साले या सवर्ण व्यक्तीने हा अर्ज दिला आहे असा आशय लिहुन कंथक सुर्यतळ यांनी 21 ऑगस्ट रोजी प्रविण साले विरुध्द अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सुधारीत 1995 या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा अर्ज सादर केला.
यासोबत कंथक सुर्यतळ यांनी काही पेपरच्या बातम्यांचे कात्रण सुध्दा जोडले. त्या वर्तमानपत्रे आणि त्यांचे मालक यांच्याविरुध्द सुध्दा कंथक सुर्यतळ नवीन अर्ज देण्याच्या तयारीत आहेत.प्रविण साले यांच्याविरुध्द दिलेल्या अर्जाला आज 12 दिवस झाली आहेत. या अर्जात कंथक सुर्यतळ यांनी लिहिलेल्या शब्दांच्या अनुरूपच रामप्रसाद खंडेलवाल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे. वास्तव न्युज लाईव्हमधील ती बातमी तर रामप्रसाद खंडेलवाल यांनी लिहिलेलीच नाही. पण प्रविण साले यांनी वास्तव न्युज लाईव्हचे नाव आपल्या निवेदनात लिहुन केलेल्या बदनामी बदल आता कंथक सुर्यतळ न्यायालयाची दारे ठोठावणार आहेत.
या निवेदनाची माहिती वास्तव न्युज लाईव्हने काढली असता कधी काळी जुना मोंढा भागात उभे राहुन सिडको-हडको ओरडून आपल्या वाहनात ग्राहक बसवणाऱ्या एका अत्यंत हुशार आणि सध्या पोलीस निरिक्षकाच्या अत्यंत जवळचा असलेल्या भारतीय जनता पार्टीतील एका मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून प्रविण साले यांनी वास्तव न्युज लाईव्हचे नाव वापरुन रामप्रसाद खंडेलवाल विरुध्द हे निवेदन लिहिले होते असे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले आहे. तीनचाकांची गाडी चालवणारा आज वाळू व्यवसायाशी सुध्दा जोडला गेला आहे. त्याला कोणी सांगितले की, प्रविण सालेच्या नावाचे आणि स्वाक्षरीचे निवेदन दे हा एक संशोधन विषय आहे. याचेही संशोधन केले जाईल पण उच्चवर्णीय असलेल्या, मराठी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या प्रविण साले यांनी अर्ज लिहित असतांना, त्यावर स्वाक्षरी करत असतांना काढलेले मराठी भाषेचे वाभाडे मराठी भाषेला लाजवणारे आहे. महानगर जिल्हाध्यक्ष हे पद लिहुन त्यावर स्वाक्षरी केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या महानगर कार्यकारणीची त्यासाठी मंजुरी घेतली होती काय? हा प्रश्न सुध्दा मोठा आहे. परवानगी घेतली नसेल तर अत्यंत शिस्तीचे मानले जाणारे भारतीय जनता पक्ष प्रविण सालेला याबद्दल का प्रश्न विचारत नाहीत? हा एक मुद्दा मोठा आहे.
https://vastavnewslive.com/2022/08/21/भारतीय-जनता-पार्टीचे-महा/