नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीला मारुन त्याचा तुम्ही खून केला आहे असे सांगत दोन महिलांसह सात जणांनी एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील 37 हजार 100 रुपये किंमतीची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतल्याचा प्रकार मौजे वाघी येथे घडला आहे.
वैजनाथ मारोती मद्ये यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेच्यासुमारास वाघी रस्त्यावर रमेश तुकाराम गायकवाड, गजानन गंगाधर खुणे, गंगाधर गणपती खुणे, दयानंद धोंडीबा दस्तके, रामा नारायण दस्तके आणि दोन महिला असे 7 जण त्यांना भेटले आणि म्हणाले शिवाजी मारोती खुणेला किडनॅप करून तुम्हीच त्याला मारुन टाकले आहे, शिवाजी खुणेला आणून दे असे बोलत अश्लिल भाषेत शिवीगाळ करून त्यांना पकडले आणि त्यांच्या उजव्या हाताच्या बोटातील 7 ग्रॅमची अंगठी 37 हजार 100 रुपयांची बळजबरीने काढून घेतली. लिंबगाव पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 137/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 395, 323, 294, 506 नुसार दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक केजगिर अधिक तपास करीत आहेत.
वाघी येथे जबरी चोरी