नांदेड(प्रतिनिधी)-दक्षिण कोरिया येथे आयोजित भारतीय खेळाडूंच्या प्रशिक्षण शिबिरासाठी सोनीपत हरियाणा येथे दिनांक 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान आयोजित निवड चाचणी प्रक्रियेत नांदेडची सुवर्णकन्या मराठवाडा एक्सप्रेस कुमारी सृष्टी बालाजी पाटील जोगदंडची अप्रतिम भरारी,अतिशय लहान वयापासून ऑलिंपिकचे ध्येय उराशी बाळगत “होय मला ऑलम्पिक मध्ये देशासाठी पदक मिळवायचा ” असा चंग बांधलेली सृष्टी ज्युनिअर वयोगटात आपली भारतीय संघात निवड कायम केली. या चाचणीत देशभरात 2551 गुण मिळवीत तिसरी तर एलिमिनेशन राउंड मध्ये दब दबा कायम ठेवीत राऊंड रॉबिनमध्येही आपले तिसरे स्थान कायम ठेवत ऑक्टोबर मध्ये दक्षिण कोरिया येथे आयोजित कॅम्प साठी आपली निवड कायम केली. कायमच क्रीडा क्षेत्रात सर्व परिचित सृष्टीला नांदेडकरांनी भरभरून प्रेम व आशीर्वाद दिला. जागतिक धनुर्विद्या स्पर्धा ,एशियन गेम ,तसेच 2024 मधील ऑलम्पिक चे ध्येय नजरेसमोर ठेवून पुढे प्रवास करणाऱ्या नांदेडच्या सुवर्णकन्येला आजपर्यंत नांदेडकरांनी, महाराष्ट्रातील लोकांनी दिलेले प्रेम व आशीर्वादाच्या जोरावरच तिची कारकीर्द देशासाठी अशीच बहरू दे त्यासाठी शुभेच्छा.
Related Posts
नांदेड जिल्ह्यात 52 पत्यांच्या जुगार अड्ड्यांना आला नवीन बहर
… साहेब खरेच स्थानिक गुन्हा शाखेला माहिती नसतील काय हे जुगार अड्डे ? नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे नांदेडला आले आणि…
आपल्या मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन
नांदेड(प्रतिनिधी)-संपुर्ण भारतातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनेने आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्यावतीने 4 जुलै रोजी देशातील प्रत्येक तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन केले.…
राज्यात 1013 न्यायाधीशांच्या बदल्या
नांदेड येथून 5 जिल्हा न्यायाधीश जाणार आणि 5 येणार, 7 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जाणार आणि 7 येणार, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी…