कुंटूर आणि रामतिर्थ पोलीसांनी १५ जुगार्‍यांवर कार्यवाही केली

नांदेड(प्रतिनिधी)-किनाळा ता.बिलोली येथे आणि वजीरगाव ता.नायगाव येथे दोन ठिकाणी पोलीसांनी धाड टाकली असून तेथे जुगार खेळणार्‍या १५ जणांनाविरुध्द कार्यवाही केली आहे. या दोन ठिकाणी मिळून पोलीसांनी ११ हजार ७१०रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.

रामतिर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार प्रल्हाद मणुआडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार किनाळा गावात संतोष दादाराव मोहिते, बालाजी येल्लपा पवार, सुनिल चांदू गायकवाड, नारायण शामराव बडमिले, ज्ञानेश्वर माधवराव मोहिते, धनराज बालासाहेब भोसले, बापूराव बळीराम भोसले सर्व रा.किनाळा ता.बिलोली हे पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्याकडून पोलीसांनी जुगार खेळण्याचे बदकछाप पत्ते आणि ६ हजार ४४० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. या सर्वांविरुध्द रामतिर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४१/२०२२ मुंबई जुगार कायद्याच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार तमलूरे हे करत आहेत.

कुुंटूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार रमेश मोहनराव निखाते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वजीरगावात लिंबाच्या झाडाखाली बसून आप्पाराव शंकर ढगे, दादाराव जगजी ढगे , शाम जयसिंगराव ढगे, शेख कलीम मियॉसाब,बालाजी अप्पाराव ढगे, विठ्ठल दगडू ढगे, नामेदव दादाराव ढगे हे सर्व तिरट नावाचा जुगार खेळत असतांना त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून बदकछाप पत्ते आणि ४ हजार २७० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. या आठ जणांविरुध्द कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५५/२०२२ मुंबई जुगार कायद्याच्या कलम १२(अ) नुसार दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक माधव पुरी यांच्या मार्गदर्शनात पेालीस अंमलदार कंधारे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *