नांदेड(प्रतिनिधी)-बॉम्ब शोधक व नाशक पथकातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार सुधारीत दराचे प्रोत्साहन (जोखीम), भत्ता मंजुर केल्याचा आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने जारी केला आहे. या आदेशावर गृहविभागाचे उपसचिव रमेश मनाळे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
12 मार्च 1993 मध्ये मुंबईमध्ये घडलेले बॉम्बस्फोट आणि त्यानंतर घडलेल्या अनेक बॉम्बस्फोटांच्या पार्श्र्वभूमीवर 22 नोव्हेंबर 1995 रोजी पोलीस दलात बॉम्ब शोधक व नाशक पथक निर्माण करण्यात आले. सुरूवातीला मुंबई आणि नंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात अशा पथकांची स्थापना झाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकात काम करतांना म्हणून त्यांना विशेष वेतन (जोखमी भत्ता)मिळू लागला. तो इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कांही जास्त आहे.
वित्त विभागाच्या सुचनेनुसार दि.1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू झाल्या. परंतू बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या नाहीत. बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुध्दा राज्य शासनाने आता 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयेागाच्या शिफारसीनुसार वेतन मिळण्याचे आदेश जारी केले आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारे मुळ वेतन 0.25 ने गुणाकार करून तो सातव्या वेतन आयोगामधील प्रात्सोहन भत्ता ठरतो. चालकांसाठी हा गुणाकार 0.15 आहे. यामुळे आता बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाढीव प्रात्सोहन (जोखीम) भत्ता मिळणार आहे. राज्य शासनाने जारी केलेले हे आदेश संकेतांक क्रमंाक 202209051709131429 नुसर राज्य शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द पण केला आहे.
बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता वाढून मिळणार