
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत पोलीस हवालदार संजय केंद्रे यांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकपदी पदोन्नती झाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी त्यांचा सन्मान केला.
काल गौरी सणाच्या दिेवशी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलातील 384 पोलीस अंमलदारांना पदोन्नती दिली. त्यात नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील दबंग पोलीस हवालदार संजय केंद्रे यांचा क्रमांक सुध्दा होता. पदोन्नतीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या हस्ते त्यांनी आपल्या नवीन पदाचे चिन्ह आपल्या खांद्यावर लावले. स्थानिक गुन्हा शाखेतील सर्व पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस अंमलदारांनी संजय केंद्रे यांना हार्दिक शुभकामना दिल्या आहेत.
