नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड शहरात दोन बोगस पोलीसांनी एका 66 वर्षीय व्यक्तीच्या 29 हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या आहेत.
मारोती तुकाराम कदम (66) हे 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजेच्यासुमारास मुखेड येथील तिरुमला ईटली सेंटरजवळ उभे असतांना दोन अनोळखी माणसे आली आणि आम्ही पोलीस असल्याचा भास दाखवून त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या किंमत 29 हजार रुपये किंमतीच्या काढून घेवून त्यांची फसवणूक केली आहे. मुखेड पोलीसांनी या प्रकरणी 271/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 170, 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जी.डी.काळे हे करीत आहेत.
बोगस पोलीसांनी मुखेड येथे 66 वर्षीय इसमाला फसवून 29 हजार रुपयांचा ऐवज लांबवला